---Advertisement---

विराट कर्णधार असलेला असा आहे आयसीसी २०१९चा सर्वोत्तम कसोटी संघ

On: बुधवार, जानेवारी 15, 2020 12:40 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज (15 जानेवारी) 2019 या वर्षाच्या पुरूष सर्वोत्कृष्ट कसोटी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये 2019वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या संघात विराटव्यतिरिक्त मयंक अगरवाल या केवळ एका भारतीय क्रिकेटपटूचा समावेश आहे.

त्याचबरोबर या संघामध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक 5 क्रिकेटपटू आहेत. तर न्यूझीलंडच्या 3 क्रिकेटपटूंना या संघात स्थान मिळले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशान, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि नॅथन लायन या खेळाडूंना आयसीसी 2019च्या सर्वोत्तम कसोटी संघात स्थान मिळाले आहे. तसेच न्यूझीलंडच्या टॉम लॅथम, बीजे वॉटलिंग आणि निल वॅगनर यांना संधी मिळाली आहे. वॉटलिंगचा यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे.

तसेच इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सलाही या संघात स्थान मिळाले आहे.

असा आहे आयसीसीचा 2019चा सर्वोत्तम कसोटी संघ –

मयंक अगरवाल, टॉम लॅथम, मार्नस लॅब्यूशान, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, बीजे वॅटलिंग (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नील वॅगनर, नॅथन लायन.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---