पोचेफस्टरूम। काल (6 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेतील सेनवेस पार्क (Senwes Park) येथे 19 वर्षाखालील विश्वचषकात 19 वर्षाखालील बांगलादेश संघ विरुद्ध 19 वर्षाखालील न्यूझीलंड संघात (Under19 Team Bangladesh and New Zealand) उपांत्य सामना (Semi- Final) पार पडला. हा सामना बांगलादेशने 6 विकेट्सने (Won By 6 Wickets) जिंकला. तसेच पहिल्यांदाच 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेशही केला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य सामन्यात विजय मिळविल्यानंतर बांगलादेशच्या संघाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी हा आनंद डान्स करत साजरा केला.
यावेळी बांगलादेशचे खेळाडू डान्स करतानाचा व्हिडिओ आयसीसीने क्रिकेट विश्वचषकाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
Those moves 🙌🙌🙌#U19CWC | #NZvBAN | #FutureStars pic.twitter.com/odtDlftTQS
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 6, 2020
त्याचबरोबर आयसीसीने क्रिकेट विश्वचषकाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आणखी एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “19 वर्षांखालील विश्वचषकात जेव्हा बांग्लादेश संघाने पहिल्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला, त्यावेळीचे हे खास क्षण.”
Re-live the special moment when Bangladesh qualified for their first ever #U19CWC final 👇 #NZvBAN | #FutureStars pic.twitter.com/9djn09Q2Nm
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 6, 2020
उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 211 धावा करत बांगलादेश समोर 212 धावांचे आव्हान ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशकडून महमुदुल हसन जॉयने (Mahmudul Hasan Joy) 127 चेंडूत 100 धावांची शतकी खेळी केली. तसेच तोव्हिद ह्रिदोय (Towhid Hridoy) आणि शहादत हुसेनने (Shahadat Hossain) प्रत्येकी 40 धावांची खेळी केली. या तिघांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने 212 धावांचे आव्हान 44.1 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पार केले.
विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ कोण आहे सर्वोत्तम? सचिन तेंडूलकरने दिले ‘हे’ उत्तर
वाचा👉https://t.co/WYrHRZkraG👈#म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020
भारताचे टेंशन वाढणार; दुसऱ्या वनडेत करावा लागणार ६ फूट ८ इंचावरुन येणाऱ्या चेंडूचा सामना
वाचा👉https://t.co/JNJwxs3V3p👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020