---Advertisement---

आयसीसी वनडे क्रमवारी : स्मृती मंधानाची घसरण, तर झुलन गोस्वामी-मिताली राज अव्वल दहामध्ये कायम

On: मंगळवार, मार्च 2, 2021 7:18 PM
---Advertisement---

मंगळवारी आयसीसीने महिला क्रिकेट संघाच्या वनडे क्रमवारीची घोषणा करण्यात आली. या क्रमवारीत भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिची घसरण झाली आहे. आता ती सहाव्या स्थानावर आहे. त्याचवेळी दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी पाचव्या स्थानावर कायम आहे.

भारतीय वनडे संघाची कर्णधार आणि अनुभवी फलंदाज मिताली राज नवव्या स्थानावर कायम आहे. तिच्या नावे ६८७ रेटिंग गुण आहेत. फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दहा मध्ये स्मृती आणि मिताली, या दोनच भारतीय खेळाडू आहेत. गोलंदाजांच्या क्रमवारीबाबत बोलायचे झाल्यास झुलन गोस्वामीसह पूनम यादव सहाव्या, शिखा पांडे सातव्या तर दीप्ती शर्मा दहाव्या स्थानी कायम आहेत.

इंग्लंडची सलामीवीर टॅमी ब्यूमॉटने नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत शानदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे तिने फलंदाजी क्रमवारीत पाच स्थानांची झेप घेऊन अव्वल स्थान गाठले आहे. तिच्या नावे आता ७६५ रेटिंग गुण आहेत. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग असून ब्यूमॉटपेक्षा ती १६ गुणांनी मागे आहे. प्रत्येकी एका क्रमांकाची घसरण झाल्याने आता तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर तर चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक फलंदाज अलिसा हिली आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची जेस जोनासन ८०४ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांनतर तिचीच संघ सहकारी मेगन शूट ७३५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे भारताच्या चार खेळाडू अव्वल दहा क्रमांकामध्ये आहेत.

आयसीसीने अष्टपैलूंची क्रमवारी देखील यावेळी जाहीर केली आहे. यात ऑस्ट्रेलियाची गुणवान खेळाडू एलियास पेरी अव्वल स्थानी आहे. वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेची मॅरीझीन कॅप तिसऱ्या स्थानी आहेत. भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने या क्रमवारीतील आपले चौथे स्थान कायम राखले आहे.

दरम्यान, आगामी ७ मार्चपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकन संघाशी दोन हात करणार आहे. कोरोनानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच मैदानावर परतणार आहे. या मालिकेत दमदार कामगिरी करून सांघिक तसेच वैयक्तिक क्रमवारीत सुधारणा करण्याचा भारतीय महिला संघाचा प्रयत्न असेल.

महत्वाच्या बातम्या:

केरळ संघाला मोठा धक्का!! नॉकआऊट सामन्यांपूर्वी हा स्टार खेळाडू झाला संघाबाहेर

दमदार कामगिरीचे पृथ्वी शॉला मिळाले बक्षीस, या मोठ्या स्पर्धेत सांभाळणार मुंबईचे नेतृत्व

बजरंग पुनिया घेतोय सोशल मीडियापासून ब्रेक, हे आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---