---Advertisement---

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन बनताच युजर्सनी दाखवली लायकी! क्रिकेटर्सच्या कुटुंबाला ट्रोल करताच भडकला हरभजन; म्हणाला…

Harbhajan-Singh
---Advertisement---

नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभूत केले. तसेच, विक्रमी सहाव्यांदा वनडे विश्वचषकाची ट्रॉफी आपल्या नावावर केली. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर काही खेळाडूंना समस्यांचा सामना करावा लागला. भारताच्या पराभवानंतर सोशल मीडिया युजर्सनी पातळी ओलांडली. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंना ट्रोल केले. एवढंच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही निशाणा बनवला. यावर आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग संतापला. त्याने या लाजीरवाण्या ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाला हरभजन?
हरभजन सिंग हा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो नेहमी देशभरातील या ना त्या गोष्टीवर निर्भीडपणे व्यक्त होत असतो. तो कोणत्याही गोष्टीवर आपले परखड मत मांडताना मागे पुढे पाहत नाही. अशात जेव्हा काही युजर्सनी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांना ट्रोल केले, तेव्हा हरभजनने आगपाखड करत मोठी प्रतिक्रिया दिली.

हरभजन सिंगने एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत लिहिले की, “ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटूंच्या कुटुंबाला ट्रोल करणे खूपच चुकीचे आहे. आपण चांगले क्रिकेट खेळलो, पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालो. फक्त एवढीच गोष्ट आहे. खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबाला ट्रोल का केले जात आहे? सर्व क्रिकेट चाहत्यांना निवेदन आहे की, अशाप्रकारचे कृत्य करू नका. प्रतिष्ठेची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे.”

https://twitter.com/harbhajan_singh/status/1726835131900633572

सामन्याविषयी थोडक्यात
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर भारतीय संघाने विराट कोहली (54) आणि केएल राहुल (66) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकात 10 विकेट्स गमावत 240 धावा केल्या होत्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने अवघ्या 43 षटकातच पार केले. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड याने शतक ठोकले. त्याने 120 चेंडूत 137 धावा केल्या. हा ऑस्ट्रेलियाचा सहावा विश्वचषक किताब ठरला. त्यापूर्वी त्यांनी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 या विश्वचषकाच्या हंगामाचा किताबही आपल्या नावावर केला होता. (icc world cup 2023 ind vs aus final former cricketer harbhajan singh asked fans why trolling australian players families)

हेही वाचा-
विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला धक्का! भारताविरुद्धच्या टी20 मालिकेतून वॉर्नर बाहेर, महत्त्वाचं कारण आलं समोर
INDvsAUS Final: ऑस्ट्रेलियाने का जिंकला वर्ल्डकप? ‘या’ निर्णयामुळे बनले सहाव्यांदा चॅम्पियन, सेहवागचा खुलासा

Ahmedabad Final INDvAUS Australian Cricketers And Their Families Trolled Final free live match harbhajan singh Harbhajan Singh Angry Harbhajan Singh Furies At Trollers harbhajan singh news Harbhajan Singh Tweets Harbhajan Singh World Cup 2023 ICC World Cup ICC World Cup 2023 ICC world cup Australia vs India ICC world cup final ICC world cup india vs Australia ICC world cup Modi ICC world cup Team India India vs Australia final Indian Cricket Team live match MAN OF THE MATCH Man of the Series Modi Stadium Mohammed Shami Narendra Modi Stadium rohit sharma virat kohli Warner who will win World Cup 2023 Final India vs Australia World Cup Final world cup final live अहमदाबाद अहमदाबाद भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना आयसीसी वर्ल्डकप आयसीसी विश्वचषक इंडिया विरुद्ध ॲास्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांना ट्रोल किती रन झालेत? कोण जिंकणार गुजरात टीम इंडिया टीम ॲास्ट्रेलिया नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात फायनल फायनल लाईव्ह भारत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया भारत विरुद्ध ॲास्ट्रेलिया भारतीय क्रिकेट संघ मॅच विनर मॅन ॲाफ द मॅच मोहम्मद शमी रोहित शर्मा वर्ल्डकप फायनल विराट कोहली विश्वचषक फायनल हरभजन सिंग हरभजन सिंग ट्रोलर्सवर भडकला हरभजन सिंग बातम्या हरभजन सिंग विश्वचषक 2023 हरभजन सिंग संतापला हरभजन सिंगचे ट्वीट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---