भारतीय क्रिकेट संघ सध्या फॉर्मच्या शिखरावर आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाचा विजयीरथ कुणालाही रोखता येत नसल्याचे दिसत आहे. याचा प्रत्यय लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअमवर रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) आला. या सामन्यात गतविजेत्या इंग्लंड संघाने भारताला 9 बाद 229 धावांवर रोखले होते. मात्र, या आव्हानाचा भारताने यशस्वी बचाव करत 100 धावांनी सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघ पुन्हा एकदा पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी विराजमान झाला.
भारतीय संघ पॉईंट्स टेबलमधील ‘टॉपर’
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषक 2023 (World Cup 2023) गाजवत आहे. बलाढ्य इंग्लंड संघाला धोबीपछाड देत भारताने स्पर्धेत विजयाचा ‘षटकार’ मारला. म्हणजेच भारताने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताला विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) मोठा फायदा झाला. भारताने 6पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले. यासह भारताचा नेट रनरेट +1.405 इतका आहे.
India ruling at the Top of the table.
England at No.10 position. pic.twitter.com/FfFPN9pVdc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 29, 2023
इंग्लंडच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात
भारताविरुद्ध 100 धावांनी पराभूत होण्यासह इंग्लंड संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशाही जवळपास संपुष्टात आल्या आहेत. गतविजेत्या संघाला पॉईंट्स टेबलमध्ये (Points Table) 2 गुणांसह दहाव्या स्थानी आहे. इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात फक्त 1 विजय, तर 5 पराभव पत्करले आहेत. त्यांचा नेट रनरेट आता -1.652 इतका आहे.
पॉईंट्स टेबलमधील इतर संघांची स्थिती पाहायची झाली, तर दुसऱ्या स्थानी 10 गुणांसह दक्षिण आफ्रिका संघ आहे. तसेच, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ प्रत्येकी 8 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी कायम आहेत. यामध्ये न्यूझीलंडचा नेट रनरेट ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला असल्यामुळे त्यांना तिसरे स्थान मिळाले आहे.
श्रीलंका पाचव्या, तर अफगाणिस्तान सातव्या स्थानी
पॉईंट्स टेबलमध्ये श्रीलंका संघ सध्या 5 पैकी 2 विजयांसह पाचव्या स्थानी आहे, जिथे त्यांचा नेट रनरेट -0.205 आहे. तसेच, पाकिस्तान संघ 6 सामन्यात 4 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. त्यांचा नेट रनरेट -0.387 आहे. याव्यतिरिक्त अफगाणिस्तान 5 पैकी 2 विजयांसह सातव्या स्थानी आहे. तसेच, नेदरलँड्स संघ 4 गुणांसह आठव्या आणि बांगलादेश संघ 2 गुणांसह नवव्या स्थानी आहे. (icc world cup 2023 points table india on top england remain on last spot see other team semifinal scenario)
हेही वाचा-
नामुष्कीजनक पराभवानंतर बटलर म्हणतोय, “आज अपेक्षा होती मात्र भारतीयांनी…”
इंग्लंडकडून लगान वसूल केल्यानंतर कॅप्टन रोहित म्हणाला, “हा असा सामना होता की…”