---Advertisement---

…म्हणून इशान किशनला रोहित शर्मा म्हणाला, ‘कोणी काही बोलले तर त्याला माझ्याशी बोलायला सांग’

---Advertisement---

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने जुलैमध्ये श्रीलंकेमध्ये वनडे पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा पराक्रमही केला होता. त्याच्या या निडरपणाचे कौतुकही झाले. असे असेल तरी त्याच्या आत्मविश्वासाचे श्रेय तो रोहित शर्माला देतो. रोहित आणि इशान हे दोघे इंडियन प्रीमीयर लीग २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात.

इशानने सांगितले की रोगित शर्माकडून कर्णधार म्हणून मुक्तपणे खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळते. रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे.

इशान किशनने आकाश चोप्राशी केलेल्या खास संभाषणात सांगितले की, ‘रोहित शर्मा नेहमी गोष्टी अगदी सोप्या ठेवतो. उदाहरणार्थ, जर त्याला असे वाटते की, मी माझ्या एकेरी धावा घेण्याच्या गोष्टींवर काम केले पाहिजे. तर तो सामन्यात काहीही बोलत नाही. सराव करताना तो मला हे समजावून सांगतो. तो सांगतो की, तुला एकेरी किंवा दुहेरी धावांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.’

इशान किशनने असेही सांगितले की, कर्णधार म्हणून रोहित शर्मा तुम्हाला पहिल्या चेंडूपासूनच तुमचा खेळ खेळू देतो. इशान किशन पुढे म्हणाला, “रोहित शर्मा असेही म्हणतो की, जर त्याला पहिल्या चेंडूवर षटकार मारायचा असेल आणि जर त्याला कोणी काही बोलले तर त्याला माझ्याशी बोलायला सांगा.”

कर्णधार म्हणून रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले आहे आणि इशान किशन या संघाचा महत्त्वाचा भाग आहे. इशान किशन अनेकदा सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसतो. 2020 मध्ये, किशनने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय टी20 संघात स्थान मिळवले. यानंतर त्याने वनडे संघातही पदार्पण केले आहे.

इशान किशनने भारतासाठी 2 वनडे सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 60 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याने 3 सामन्यांमध्ये 40 च्या सरासरीने 80 धावा केल्या आहेत. इशान किशनने त्याच्या वनडे आणि टी -20 पदार्पणात अर्धशतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना अकमलची इंग्रजी पाहून तुम्हीही खदखदून हसाल; चाहते म्हणाले…

शतकांच्या शतकाचं इंजिन आज जोडलं गेलं होतं, याचदिवशी सचिनने केलं होतं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक

…आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---