Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कानपूर कसोटीनंतर मुंबईत भारत-न्यूझीलंडची अग्निपरिक्षा, पण ‘या’ ३ बदलांसह विराटसेनेचा विजय निश्चित!

November 30, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/BCCI

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. त्या सामन्यात भारत एका क्षणी विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते. पण न्यूझीलंड संघाने शेवटपर्यंत किल्ला लढवला आणि सामना अनिर्णित राखला. कानपूर कसोटीत भारताला विजयासाठी फक्त एका विकेटची गरज होती. पण आता भारताला मालिका जिंकायची असेल, तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत जबरदस्त कामगिरी करावी लागेल. या सामन्यात भारताला विजय मिळवायचा असेल तर संघाला कोणत्याही परिस्थितीत खालील तीन बदल करावे लागतील.

१. अजिंक्य रहाणेच्या जागी विराट कोहली
विराट कोहली पहिली कसोटी खेळू शकला नसला तरी दुसऱ्या सामन्यात त्याचे पुनरागमन निश्चित आहे. पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणेने कर्णधारपद भूषवले होते. पण आता कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये आल्यास कोण बाहेर पडेल, हा प्रश्न आहे. पदार्पणाच्या सामन्यात शतक आणि अर्धशतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरला संघ व्यवस्थापन वगळू शकत नाही. अशा स्थितीत अजिंक्य रहाणेला संघातून वगळायला हवे. रहाणे गेल्या काही काळापासून अतिशय खराब फॉर्ममधून जात आहे. मजबूत भागीदारी करण्यासाठी तो खेळपट्टीवर जास्त वेळ घालवू शकत नाही. यावर्षी त्याची सरासरी अवघी १९.५७ इतकी राहिली आहे.

२. इशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराज
या मालिकेत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचा समावेश नाही आहे. हे दोन्ही गोलंदाज भारतीय वेगवान आक्रमणाची जबाबदारी सांभाळतात. पहिल्या कसोटीत इशांत शर्मावर ही मोठी जबाबदारी होती, पण तो चमत्कार करू शकला नाही. इशांत शर्माने २२ षटके टाकली, ज्यात त्याला एकही यश मिळवता आले नाही. दुसऱ्या कसोटीत इशांतच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देणे संघ व्यवस्थापनासाठी योग्य ठरू शकते. सिराज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मोहम्मद सिराजसारखा आक्रमक गोलंदाज वानखेडेसारख्या खेळपट्टीवर योग्य ठरेल.

३. वृद्धीमान साहाला वरच्या क्रमांकावर पाठवणे
भारतीय कसोटी संघात यष्टीरक्षकाच्या स्थानासाठी नेहमीच स्पर्धा सुरू असते. रिषभ पंतलाही अद्याप संघातील आपली जागा निश्चित करता आलेली नाही. या मालिकेतून पंतलाही विश्रांती देण्यात आली आहे आणि त्याच्या जागी साहाला निवडण्यात आले आहे. कानपूर येथील पहिल्या कसोटीत साहाने पहिल्या डावात सातव्या क्रमांकावर आणि दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजी केली. पहिल्या डावात त्याने केवळ एक धाव केली आणि दुस-या डावात नाबाद ६१ धावा करून भारताला मजबूत स्थितीत आणले.

आपल्या ११ वर्षांच्या दीर्घ कसोटी कारकिर्दीत, साहाने खालच्या क्रमवारीत वेगवेगळ्या स्लॉटमध्ये स्वत:ला सिध्द करून आपली चमक दाखवली आहे. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, तो त्याच्या नेहमीच्या क्रमांक ७ च्या तुलनेत, सहाव्या क्रमांकावर सात डावांमध्ये ३५.६७ च्या सरासरीने चांगली फलंदाजी केली आहे. या क्रमांकावर त्याने केवळ धावाच केल्या नाहीत तर एक शतक आणि एक अर्धशतकही झळकावले आहे.

भारताची सध्याची मध्यम फळी आणि शेवटची फळी गेल्या काही काळापासून फारसे काही करू शकलेले नाहीत. हे लक्षात घेऊन साहाला फलंदाजीत सहाव्या क्रमवारीत स्थान देण्याची चांगली वेळ आहे. त्याच्यानंतर रवींद्र जडेजा, रवी अश्विन आणि अक्षर पटेल फलंदाजीला येऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL Retention: कोणाच्या ताफ्यात कोण राहिलं कायम अन् कोणाच्या खिशात उरली किती रक्कम? वाचा एका क्लिकवर

“मुंबई कसोटीसाठी कोणीही पुनरागमन केलं, तरी श्रेयस अय्यर संघाबाहेर होणार नाही, दुसरं कोणीतरी होईल”

जहाँ जाऊँ, तुझे पाऊँ..! उतावळा शार्दुल साखरपुड्यात मितालीसोबत भलताच रोमँटिक, व्हिडिओ पाहाच


Next Post
Screengrab: Twitter/@BCCI

श्रेयसने सांगितला अश्विनसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यावेळी वानखेडेत बॉल बॉय होता शतकवीर

Photo Courtesy: Twitter/TheRealPCB

कसोटी सामना सुरु असतानाच 'या' महत्त्वाच्या सदस्याने सोडली पाकिस्तान संघाची साथ

KL-Rahul-and-Rohit-Sharma

भारताच्या 'या' जखमी क्रिकेटरने मुंबई कसोटीआधी केली सरावाला सुरुवात, किवींना फोडणार घाम

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143