---Advertisement---

IPL Retention: कोणाच्या ताफ्यात कोण राहिलं कायम अन् कोणाच्या खिशात उरली किती रक्कम? वाचा एका क्लिकवर

On: मंगळवार, नोव्हेंबर 30, 2021 10:55 PM
MI vs CSK (MS Dhoni and Rohit Sharma)
---Advertisement---

मंगळवार रोजी (३० नोव्हेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामासाठी रिटेंशन प्रक्रिया संपन्न झाली असून अधिकृतरित्या जुन्या ८ फ्रँचायझींनी संघात कायम केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहे. या ८ फ्रँचायझींना प्रत्येकी ४ खेळाडूंना आपल्या ताफ्यात कायम ठेवण्याची संधी होती. त्यानुसार काही फ्रँचायझींनी आपल्या संघातील सरस ४ शिलेदारांना संघासोबत जोडले आहे. मात्र काही संघांनी ३ तर काहींनी केवळ २ खेळाडूंना रिटेन केले आहे.

या फ्रँचायझींमध्ये कोणते खेळाडू रिटेन झाले आणि रिटेंशन प्रक्रियेनंतर कोणत्या फ्रँचायझीकडे लिलावासाठी किती रक्कम राहिली, याबद्दल जाणून घेऊया अधिक माहिती-

दिल्ली कॅपिटल्स-

गेल्या ३ हंगामात आपल्या कामगिरीने प्रभावित केलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने ४ खेळाडूंना कायम केले असून यामध्ये रिषभ पंत, अक्षर पटेल आणि पृथ्वी शॉ या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर एन्रीच नॉर्किए या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाला संघात कायम केले आहे. दिल्लीने पंतला १६ कोटींमध्ये, अक्षर पटेलला ९ कोटींमध्ये, पृथ्वी शॉला ७.५ कोटींमध्ये आणि एन्रीच नॉर्किएला ६.५ कोटींमध्ये संघात कायम केले आहे. त्यामुळे लिलावासाठी त्यांच्याकडे ४८ कोटी रुपये उरले आहेत.

https://twitter.com/IPL/status/1465721817562157057?s=20

कोलकाता नाईट रायडर्स-

गतउपविजेता कोलकाता नाईट रायडर्सने देखील ४ खेळाडूंना संघात कायम केले असून यामध्ये आंद्रे रसल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर आणि सुनील नारायण या चार खेळाडूंना संघात कायम केले आहे. रसेलला १२ कोटींमध्ये कायम केले असून चक्रवर्ती आणि व्यंकटेशला प्रत्येकी ८ कोटींमध्ये, तसेच नारायणला ६ कोटींमध्ये कायम केले आहे. त्यांच्याकडे लिलावासाठी आता ९० पैकी ४८ कोटी रुपये शिल्लक आहेत.

https://twitter.com/IPL/status/1465723135550836739?s=20

राजस्थान रॉयल्स-

आयपीएलचा सर्वात पहिला विजेता राहिलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२२ साठी ३ खेळाडूंना संघात कायम केले आहे. त्यांनी संजू सॅमसनला १४ कोटींमध्ये, जॉस बटलरला १० कोटींमध्ये आणि युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला ४ कोटींमध्ये संघात कायम केले आहे. त्यामुळे संघाकडे लिलावासाठी ६८ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजस्थान रॉयल्सने प्रतिभावान गोलंदाज जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्सला संघात कायम केलेले नाही.

https://twitter.com/IPL/status/1465724620900761610?s=20

सनरायझर्स हैदराबाद-

सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२२ साठी न्यूझीलंडच्या केन विलियम्सनला संघात कायम केले असून त्याच्याबरोबरच अब्दुल समाद आणि उम्रान मलिक या अनकॅप खेळाडूंना (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले) संघात कायम केले आहे. विलियम्सनला १४ कोटींमध्ये, तर समाद आणि मलिक यांना प्रत्येकी ४ कोटींमध्ये संघात कायम करण्यात आले आहे. त्यामुळे लिलावासाठी सनरायझर्स हैदराबादकडे ६८ कोटी रुपये उरले आहेत.

https://twitter.com/IPL/status/1465718324528967682?s=20

पंजाब किंग्ज-

प्रीती झिंटा सहसंघमालकिण असलेल्या पंजाब किंग्स संघाने केवळ २ खेळाडू संघात कायम ठेवले आहेत. मयंक अगरवाल आणि अर्शदीप सिंग या दोन खेळाडूंना कायम केले आहे. पंजाब किंग्जने सलामीवीर फलंदाज मयंकसाठी १२ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर वेगवान गोलंदाज अर्शदीपला ४ कोटींसह संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे आता लिलावासाठी संघाकडे तब्बल ७४ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत.

पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलला संघ रिटेन करू इच्छित होता. परंतु त्याने लिलावात उतरणे पसंत केल्याने ते शक्य झाले नाही, अशी माहिती संघ प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी दिली आहे. त्यामुळे आता येत्या हंगामात मयंकच्या हाती संघाची धुरा सोपवली जाऊ शकते.

https://twitter.com/IPL/status/1465718100863553537?s=20

चेन्नई सुपर किंग्ज-

आयपीएल २०२१ हंगामाचे जेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने ४ खेळांडूंना संघात कायम केले आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजा चेन्नईने रिटेन केलेला पहिला खेळाडू असून एमएस धोनी दुसरा खेळाडू आहे. जडेजाला १६ कोटींमध्ये, तर धोनीला १२ कोटींमध्ये संघात कायम करण्यात आले आहे. याशिवाय आयपीएल २०२१ हंगाम गाजवलेल्या ऋतुराज गायकवाड आणि मोईन अलीला चेन्नईने कायम केले आहे. मोईन अलीला ८ कोटींमध्ये आणि ऋतुराज गायकवाडला ६ कोटींमध्ये कायम केले आहे. त्यामुळे आता लिलावासाठी चेन्नईकडे ४८ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत.

https://twitter.com/IPL/status/1465720028641173508?s=20

मुंबई इंडियन्स-

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ हंगामासाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव या भारतीय खेळाडूंना, तर कायरन पोलार्ड या परदेशी खेळाडूला संघात कायम केले आहे. संघाने ४ खेळाडूंना संघात कायम केले असल्याने आता लिलावासाठी संघाकडे ४८ कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत.

मुंबई इंडियन्सने ४ खेळाडूंना संघात कायम ठेवताना रोहित शर्मासाठी १६ कोटी, जसप्रीत बुमराहसाठी १२ कोटी, सूर्यकुमार यादवसाठी ८ कोटी आणि पोलार्डसाठी ६ कोटी रुपये मोजले आहेत.

https://twitter.com/IPL/status/1465715173541376001?s=20

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर-

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाची खेळाडूंची रिटेंशन प्रक्रिया सुरू झाली असून सर्वप्रथम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. बेंगलोरने त्यांचा माजी कर्णधार आणि रनमशीन म्हणून ओखळला जाणारा विराट कोहली याला येत्या हंगामासाठी संघात कायम ठेवले आहे. त्यांनी १५ कोटी खर्च करत विराटला ताफ्यात घेतले आहे.

विराटबरोबर त्याचा लाडका शिलेदार म्हटला जाणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही ७ कोटींची रक्कम मोजत संघात कायम ठेवण्यात आले आहे. तर परदेशी खेळाडूच्या रुपात विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला घेतले गेले आहे. त्याच्यासाठी आरसीबीने ११ कोटींची किंमत मोजली आहे.

https://twitter.com/IPL/status/1465713429189066761?s=20

महत्त्वाच्या बातम्या-

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---