क्रिकेटटॉप बातम्या

श्रेयसने सांगितला अश्विनसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यावेळी वानखेडेत बॉल बॉय होता शतकवीर

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना पार पडला. न्यूझीलंड संघ हा सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरला. भारतासाठी या सामन्यातन पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार खेळी केली. तसेच रविचंद्रन अश्विनने देखील गोलंदाचीचे अप्रतिम प्रदर्शन करून जबरदस्त पुनरागमन केले. सामना संपल्यानंतर श्रेयस अय्यरने बीसीसीआय टीव्हीसाठी अश्विनची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान अय्यरने अश्विनसोबतच्या त्याच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला.

मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर २००९ मध्ये अश्विन आणि अय्यरची पहिली भेट झाली होती. त्यावेळी या दोघांनीही त्यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले नव्हते. बीसीसीआय टीव्हीसाठी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान अय्यरने या गोष्टीची आठवण करून  दिली.

तो म्हणाला की, “आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात मी बॉल बॉय होतो आणि अश्विन माझ्या वळ आला आणि मला विचारले, येथे हवा कोणत्या दिशेने येते, जरा सांग. मी त्यावेळी वानखडेमध्ये खूप सारे सामने खेळलो होतो. मी त्याला म्हणालो, येथून येते. या दिशेला समुद्र आहे, त्यामुळे हवा त्या दिशेने येईल.”

अय्यरने त्याच्या या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात १०५ आणि दुसऱ्या सामन्यात ६५ धावा केल्या. अय्यर पहिला भारतीय खेळाडू बनला आहे, ज्याने कसोटी पदार्पण सामन्यात शतक आणि अर्धशतक केले. याबाबत अश्विनने त्याचे अभिनंदन केले. अश्विन त्याला म्हटला की, “तुला (अय्यर) कसोटी पदार्पण सामन्यात शतक आणि अर्धशतक करणारा पहिला भारतीय बनण्यासाठी अभिनंदन.”

अय्यरने या सामन्यात अप्रतिम खेळ दाखवला असला तरी, न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळेल याबाबत अजूनही शंका आहे. कारण भारतीय कसोटी संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांतीवर होता. आता विराट दुसऱ्या कसोटी सामन्यातून संघात पुनरागमन करणार आहे. अशात अय्यरला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले जाऊ शकते.

दरम्यान, भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. पण न्यूझीलंडच्या तळातील फलंदाजांनी शेवटच्या दिवशी संयमी खेळ दाखवला आणि सामना अनिर्णीत केला. न्यूझीलंडचे एजाज पटेल (२) आणि रचिन रवींद्र (१८) हे दोन खेळाडू शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिले आणि भारताच्या हातातून विजय हिसकावून घेतला. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना तीन डिसेंबरपासून मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कानपूर कसोटीनंतर मुंबईत भारत-न्यूझीलंडची अग्निपरिक्षा, पण ‘या’ ३ बदलांसह विराटसेनेचा विजय निश्चित!

“मुंबई कसोटीसाठी कोणीही पुनरागमन केलं, तरी श्रेयस अय्यर संघाबाहेर होणार नाही, दुसरं कोणीतरी होईल”

IPL Retention: कोणाच्या ताफ्यात कोण राहिलं कायम अन् कोणाच्या खिशात उरली किती रक्कम? वाचा एका क्लिकवर

Related Articles