आयपीएल २०२० चा अंतिम सामना मंगळवारी(१० नोव्हेंबर) दुबई येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याबरोबरच आयपीएलच्या १३ व्या हंगामाची सांगता होईल. हा आयपीएल हंगाम आत्तापर्यंत सर्वाधिक रोमांचक ठरला आहे. आत्तापर्यंत या आयपीएल हंगामात तब्बल ५ सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. त्यातील २ सुपर ओव्हर एकाच सामन्यात खेळवण्यात आल्या. म्हणजेच या आयपीएल हंगामात एकूण ४ सामने बरोबरीत सुटले ज्यांचे निकाल सुपर ओव्हरमध्ये निघाले. त्यामुळे आता जर अंतिम सामना देखील बरोबरीत सुटला तर कोणते नियम लागू होतील, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यामुळे या लेखात अंतिम सामना बरोबरीत सुटला तर कोणते नियम लागू होतील याचा आढावा घेतला आहे.
नियम कोणते आहेत?
जर अंतिम सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. तसेच जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत सुुपर ओव्हर खेळवली जाईल. तसेच आयसीसीच्या नवीन नियमानुसार, जर सुपर ओव्हरमध्येही जर सामना बरोबरीत सुटला, तर जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत सामना खेळवला जाईल.
सुपर ओव्हर खेळण्यासाठी प्रत्येक संघ ३ फलंदाज निवडतो. तर १ गोलंदाज सुपर ओव्हरमधील सर्व ६ चेंडू टाकतो. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या त्या सुपर ओव्हरमध्ये २ विकेट्स गेल्या तर त्यांचा डाव दुसऱ्या विकेट पडल्याबरोबर संपतो. नेहमीच्या मर्यादीत षटकांच्या सामन्याप्रमाणेच सुपर ओव्हरमध्येही विजयासाठी प्रथम फलंदाजी केलेल्या संघापेक्षा १ धाव जास्त करण्याचे आव्हान धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला असते. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला गोलंदाजी करताना आपण केलेल्या धावांचे रक्षण करण्याचे आव्हान असते.
सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली तर…
- पहिली सुपर ओव्हर बरोबरीत सुटली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवली जाईल. तसेच जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवले जातील.
- सामान्य परिस्थितीत दुसरी सुपर ओव्हर सुरू होण्यामध्ये ५ मिनिटांपेक्षा अधिक वेळेचा ब्रेक नसला पाहिजे.
- आधीच्या सुपर ओव्हरमध्ये ज्या संघाने दुसऱ्यांदा फलंदाजी केली होती, तोच संघ पुढील सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करेल.
- सुपर ओव्हरसाठी संघांनी जो चेंडू निवडला होता, त्याच चेंडूने पुढील सुपर ओव्हर टाकली जाईल.
- क्षेत्ररक्षण करणारा संघ पुढील सुपर ओव्हर त्या बाजूने टाकू शकत नाही. ज्या बाजूने त्यांनी आधीची सुपर ओव्हर टाकली होती. म्हणजेच पुढील सुपर ओव्हर दुसऱ्या बाजून टाकली जाईल.
- मागील सुपर ओव्हरमध्ये जो फलंदाज बाद झाला आहे, तो पुढील सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी येऊ शकत नाही. तसेच ज्या गोलंदाजाने पहिली सुपर ओव्हर टाकली आहे, तो दुसरी सुपर ओव्हर टाकू शकत नाही.
- सर्व खेळण्याच्या अटी पूर्वीच्या सुपर ओव्हरप्रमाणेच राहतील.
महत्त्वाच्या बातम्या –
AUS vs IND : आता मैदानात घुमणार प्रेक्षकांचा गजबजाट; ऑस्ट्रेलिया क्रिकेटने केली मोठी घोषणा
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी
ट्रेंडिंग लेख –
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय