रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. खेळाडूंना दोन दिवसांनंतर लिसेस्टरशन संघाविरुद्ध सराव सामना खेळयचा आहे. या सराव सामन्यानंतर १ जुलैला भारत आणि इंग्लंड संघ आमने सामने येतील. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषक संपल्यानंतर राहुल द्रविड भारताचा मुख्य प्रशिक्षक बनला. प्रशिक्षकाच्या रूपात द्रविडसाठी इंग्लंडविरुद्धचा हा कसोटी सामना खूपच महत्वाचा ठरणार आहे.
भारताने यापूर्वी इंग्लंडमध्ये एकूण १८ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्यापैकी १४ मालिका इंग्लंडने जिंकल्या, तर भारताने ३ मालिका जिंकल्या आहेत. तर एक कसोटी मालिका अनिर्णीत राहिली होती. २००७ मध्ये भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच मायदेशात पराभूत केले होते. राहुल द्रविड (Rahul Dravid) त्यावेळी भारताचे नेतृत्व करत होता. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकू शकला नाहीये.
मागच्या वर्षी जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता, तेव्हा संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात केली होती, पण मालिका पूर्ण होऊ शकली नाही. संघात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यामुळे मालिकेती शेवटचा सामना रद्द केला गेला होता, जो यावर्षी खेळला जात आहे. मालिकेत भारत २-१ अशा घाडीवर आहे. यावर्षी खेळला जाणारा शेवटचा सामना जर भारताने जिंकला किंवा अनिर्णीत जरी केला, तरी संघ मालिका नावावर करेल. द्रविडने कर्णधाराच्या रूपात २००७ मध्ये जी कामगिरी केली होती, तशीच कामगिरी आता तो प्रशिक्षकाच्या रूपात देखील करू शकतो.
मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहली भारताचा कर्णधार होता, पण यावर्षी तो कर्णधार नाहीये. सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचे नेतृत्व करत असला, तरी विराट कोहली (Virat Kohli) देखील संघाचा एक वरिष्ठ खेळाडू आहे. विराटचा संघाच्या कॅम्पमध्ये त्याच्या प्रभाव अजूनही तसाच आहे, जसा तो कर्णधार असताना होता.
विराटचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होता आहे. व्हिडिओत तो अगदी त्याच्या जुन्या अंदाजात दिसत आहे. प्रशिक्षर राहुल द्रविड (Rahul Dravid) देखील व्हडिओत दिसत आहेत आणि त्यांना विराटवर खास जबाबदारी सोपवली आहे. संघाचा माजी कर्णधार आजही सराव सत्रात खेळाडूंमध्ये उर्जा आणण्याचे काम करताना दिसत आहे. व्हिडिओत विराट आजही संघाचा कर्णधार असल्यासारखा वाटत आहे.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यानंतर भारताला या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका देखील खेळायची आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
BIG BREAKING । भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला कोरोनाची लागण, कसोटी खेळण्यावर प्रश्नचिन्ह
वनडे क्रिकेटच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा डेविड वॉर्नर ठरला दुसराच खेळाडू
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० वर्षानंतर प्रथमच श्रीलंका संघाने रचला ‘हा’ इतिहास