IPL 2024 Auction: शनिवारी (दि. 19 डिसेंबर) दुबईत आयपीएल 2024 मिनी लिलाव पार पडला. या लिलावात पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांना ताफ्यात घेण्यासाठी संघांनी आपली पर्स रिकामी केली. कमिन्सला सनरायझर्स हैदराबाद संघाने 20 कोटींपेक्षा जास्त, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने स्टार्कला 24 कोटींपेक्षा जास्त रुपये खर्चत संघात घेतले. अशाप्रकारे आयपीएल लिलावाच्या इतिहासातील स्टार्क सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र, भारतीय संघाचे माजी खेळाडू भारताच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये मिळालेल्या पैशांवरून खुश नाहीयेत.
सुरेश रैना, पार्थिव पटेल, आरपी सिंग आणि आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांना वाटते की, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि इतर खेळाडू परदेशी खेळाडूंपेक्षा जास्त पैसे मिळण्यासाठी पात्र आहेत.
त्यांनी आयपीएल 2024 (IPL 2024) लिलावादरम्यान बोलताना म्हटले की, मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याला केकेआरने (KKR) 24.75 कोटी रुपयात खरेदी केले. तसेच, पॅट कमिन्स (Pat Cummins) हैदराबादकडे (SRH) 20.50 कोटी रुपयात गेला. यासह हे दोन्ही परदेशी खेळाडू स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू बनले.
यावर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, “आयपीएल संघांकडे 200 कोटी रुपयांची पर्स असावी. त्यातील 150 कोटी रुपये भारतीय खेळाडूंसाठी असावेत. तसेच, उर्वरित 50 कोटी रुपये परदेशी खेळाडूंसाठी असावेत. विराट कोहली जर लिलावात असता, तर तो 42 कोटी रुपयांना विकला गेला असता.”
Akash Chopra said – “Virat Kohli would go for INR 42 Crore if he comes to the Auction table”.#IPLAuction pic.twitter.com/NuRnfEKNAK
— Over Thinker Lawyer 🇵🇰 (RCB ♥️) (@Mujha_q_Nakala) December 19, 2023
यावेळी सुरेश रैनानेही आकाश चोप्राच्या वक्तव्याला सहमती दर्शवली. तो म्हणाला की, “जसप्रीत बुमराहला 12 कोटी, एमएस धोनीला 12 कोटी, मोहम्मद शमीला 5 कोटी. तसेच, जे खेळाडू मागील 8 वर्षांपासून लीगचा भाग नाहीत आणि ज्यांनी फक्त 26 सामने खेळलेत, त्यांना 25 कोटी रुपये दिलेत. हे योग्य नाही.”
खरं तर, विराट कोहली (Virat Kohli) याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने आयपीएल 2024 साठी 15 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. अशात, परदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूंच्या तुलनेत मिळत असलेल्या जास्त पैशांवरून चाहत्यांसोबतच माजी खेळाडूही वेगवेगळी मते मांडत आहेत. (If this Indian player had come in the auction, it would have fetched Rs 42 crores says former cricketer)
हेही वाचा-
‘आज खूप काही बदललं…’, भारताला पराभवाचा झटका दिल्यानंतर यजमानांच्या कर्णधाराचं लक्षवेधी भाष्य
दक्षिण आफ्रिकेकडून हारताच कर्णधार राहुलचं सर्वात मोठं विधान; म्हणाला, ‘आमच्या संघाला ते जमलंच नाही…’