भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडच्या दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. पहिले त्याने एजबस्टन कसोटीमध्ये संघाचे नेतृत्व केले. यावेळी त्याने ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तो सामना मागील वर्षीच्या कसोटी मालिकेतील पूर्व नियोजित होता. यामुळे शेवटच्या सामन्यानंतर तो मालिकावीर ठरला आहे. नंतर त्याने मर्यादित षटकांच्या सामन्यातही विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची ही कामगिरी अशीच राहिली तर तो आगामी टी२० विश्वचषकात महत्वाची भुमिका निभावू शकतो. असे असतानाच ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ब्रॅड हॉग (Brad Hogg) याने बुमराहबद्दल धक्कादायक विधान केले आहे.
“भारतीय संघाला बुमराहच्या सामन्यांचे नियोजन करावे लागेल, तसे झाले नाही तर त्याच्या कामगिरीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याच्या सामन्यांचे योग्य ते नियोजन केले तर तो कसोटी क्रिकेटमध्ये रिफ्रेश राहील. त्याला जर टी२०मध्ये खेळवायचे असेल तर मेडिकल स्टाफची यामध्ये महत्वाची भुमिका असणार आहे,” असे हॉगने म्हटले आहे. यावेळी त्याने ब्रेट लीचे उदाहरणही दिले आहे.
हॉगने २००३च्या विश्वचषकादरम्यान ब्रेट ली बाबत फिजियोने कशाप्रकारे निर्णय घेतले होते. तसे काही योग्य निर्णय घेण्याची जबाबदरी बुमराहच्या बाबतीत असणार आहे, असेही त्याने सुचविले आहे.
“२००३च्या विश्वचषकाआधी आम्हाला कसोटी मालिका खेळायची होती. त्यावेळी लयीत असणारा ब्रेट ली याच्यावर खूपच दबाव होता. अशावेळी त्याने फिजिओशी चर्चा केली, त्यानंतर तो त्या स्पर्धेत जलद गोलंदाजी करत चांगली कामगिरी केली होती,” असे हॉगने म्हटले आहे.
असे का घडले, कारण त्याने फिजिओसोबत बसून संपूर्ण नियोजन केले होते. त्यावेळी तो ही त्याच्या कामगिरीच्या शिखरावर होता. त्याने सगळे नियोजन केल्याने ते सर्वकाही नीट घडून आले. त्या स्पर्धेत ब्रेट ली हा सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने १० सामन्यात २२ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने अंतिम सामन्यात भारताविरुद्ध ७ षटके टाकताना ३१ धावा देत २ विकेट्सही घेतल्या होत्या. यामध्ये त्याने एक षटक निर्धावही टाकले होते.
बुमराहने इंग्लंडच्या दौऱ्यात एका टी२० सामन्यात खेळताना २ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच पहिल्या वनडे सामन्यात १९ धावा देत ६ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. लॉडर्सच्या वनडे सामन्यातही त्याने २ विकेट्स घेतल्या होत्या. सध्या तो आयसीसी वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जागतिक क्रिकेटमध्ये कुणालाही जमलं नाही, ते ‘या’ पाच भारतीयांनी केलं, विक्रम आजही अबाधित





