ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या आयोजनाविषयी एक सल्ला दिला आहे. ज्यामुळे स्पर्धा निर्धारित वेळापत्रकानुसार करण्यात येऊ शकते.
विश्वचषकाबद्दल बोलताना हॉग (Brad Hogg) म्हणाला की, “विश्वचषक स्पर्धा रद्द केली नाही पाहिजे. या स्पर्धेतील सामने मोकळ्या मैदानात खेळवावे लागले तरी चालतील. परंतु या स्पर्धेचे आयोजन झाले पाहिजे. कारण जगभरातील क्रिकेटप्रेमी या स्पर्धेची वाट पाहत आहेत. चाहत्यांना आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंंना पहायचे आहे.”
हॉग पुढे म्हणाला की, “अनेक सारे खेळाडू लॉकडाऊनमुळे (Lockdown) घरात वेळ घालवत आहेत. त्यांना बाहेर जाऊन सराव करता येत नाही. त्यामुळे आपण त्यांना दीड महिना अगोदर ऑस्ट्रेलियात आणले पाहिजे. सध्या कोणतेही कमर्शियल विमाने नाहीत. त्यामुळे आपल्याला चार्टर्ड विमानांचा (Chartered Airplane) वापर करण्याची आवश्यकता आहे.”
“चार्टर्ड विमानांनी येणाऱ्या खेळाडूंची चाचणी झाली पाहिजे. जर त्यांची चाचणी निगेटिव्ह आली तरच ते ऑस्ट्रेलियामध्ये येऊ शकतात,” असेही हॉग पुढे म्हणाला.
असे असले तरीही ऑस्ट्रेलियाचा (Australia) अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) मोकळ्या मैदानात विश्वचषक करण्याच्या चर्चेवर नकार व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, आयपीएल प्रेक्षकांशिवाय होऊ शकते. परंतु टी२० विश्वचषक होणार नाही.
एबीसी ग्रँडस्टँडशी बोलताना मॅक्सवेल म्हणाला की, “आमच्यासाठी प्रेक्षकांना एकत्र आणणे कठीण होईल. मला असे वाटते की, जर आयपीएल प्रेक्षकांशिवाय झाले तर, ते यशस्वी होण्याची अपेक्षा आहे. परंतु मी प्रेक्षकांंशिवाय टी२० विश्वचषक (T20 World Cup) यशस्वी होताना पाहू शकत नाही.”
“आमच्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय विश्वचषक खेळवणे कठीण होईल. त्यामुळे विश्वचषक लवकर होण्याची शक्यता फार कमी आहे. आम्हाला सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-बाबारे! आयपीएलमध्ये निवड एवढ्या सहजासहजी नाही होतं रे
-मोठ्या खेळाडूने सांगितले भारताच्या सर्वात बेस्ट क्षेत्ररक्षकाचे नाव
-सर्वाधिक वेळा आंतरराष्ट्रीय सामन्यांत नाबाद राहणारे ५ महान क्रिकेटपटू