---Advertisement---

मुंबईच्या पोलार्डने थेट स्टेडिअमबाहेर मारला षटकार, एकाने चेंडू घेऊन ठोकली धूम, तर दुसऱ्याने केला परत

On: मंगळवार, जानेवारी 31, 2023 1:05 PM
Kieron-Pollard
---Advertisement---

अनेक प्रकारचे क्रिकेट प्रेमी आपल्याला पाहायला मिळतात. काही आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी थेट सुरक्षा रक्षा घेरा भेदत मैदानात येतात, काही स्टेडिअममध्ये आलेला चेंडू आपल्याकडेच ठेवतात, तर काही त्याच चेंडूसाठी भांडणही करतात. अशाप्रकारे क्रिकेटपटू आणि क्रिकेटमधील वस्तूंसाठी चाहते खूपच उत्सुक असतात. अनेकदा चेंडू स्टेडिअमच्या बाहेर जातो, तेव्हा तो परत मिळण्याची शक्यताही खूपच कमी असत. काही चाहते तो परत करतात, तर काही चाहते तोच चेंडू घेऊन पळूनही जातात. या दोन्ही घटना यूएईत सुरू असलेल्या इंटरनॅशनल लीग टी20 म्हणजेच आंतरराष्ट्रीय लीग टी20 स्पर्धेत घडली आहे. यादरम्यानचा व्हिडिओदेखील जोरदार व्हायरल होत आहे.

एमिरेट्सचा विजय
आंतरराष्ट्रीय लीग टी20 (International League T20) स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू बॅट आणि चेंडूतून दम दाखवत आहेत. रविवारी (दि. 29 जानेवारी) शारजाह येथे डेझर्ट वायपर्स विरुद्ध एमआय एमिरेट्स (Desert Vipers vs MI Emirates) संघात रंजक सामना पार पडला. हा सामना वायपर्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी एमिरेट्सकडून फलंदाजी करताना एका नाही, तर तीन फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. तसेच, एमिरेट्स संंघाने 20 षटकात 3 विकेट्स गमावत 241 धावा चोपल्या. हे आव्हान पार करताना वायपर्स संघ 12.1 षटकातच 84 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे एमिरेट्सने हा सामना तब्बल 157 धावांनी जिंकला.

एकाने चेंडू परत केला, तर दुसऱ्याने काढला पळ
या सामन्यात एमिरेट्सकडून कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने 19 चेंडूत 50 धावा कुटल्या. या धावा करताना त्याने 4 चौकार आणि 4 षटकारांचा पाऊस पाडला. हा सामना पोलार्डच्या संघाने जिंकला खरा, पण सर्वाधिक चर्चा पोलार्डच्या खेळीची झाली. यादरम्यानचा एक मजेशीर व्हिडिओही व्हायरल होत आहे.

शारजाह क्रिकेट स्टेडिअममध्ये पार पडलेल्या या सामन्यात एमआय एमिरेट्स (MI Emirates) संघाचा फलंदाज डॅन मुसली (Dan Mousley) याने एक जोरदार गगनचुंबी षटकार मारला. हा चेंडू थेट स्टेडिअमच्या बाहेर रस्त्यावर जाऊन पडला. यावेळी हा चेंडू एका चाहत्याने घेऊन पळ काढला. ही घटना 18व्या षटकात घडली. हे षटक डेझर्ट वायपर्स (Desert Vipers) संघाचा गोलंदाज मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) टाकत होता. त्याच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मुसलीने जोरदार फटका मारला. त्यामुळे चेंडू स्टेडिअमबाहेरील रस्त्यावर पडला. त्यावेळी एक चाहता चेंडू उचलून धावताना दिसला. त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीतील व्यक्तीलाही तो चेंडू दाखवला.

यानंतर पुढच्याच चेंडूवर पोलार्डनेही 104 मीटर लांब षटकार मारला. हा चेंडूदेखील पुन्हा स्टेडिअमच्या बाहेर गेला. मात्र, यावेळी एका चाहत्याने चेंडू घेऊन पळ काढण्याऐवजी चेंडू स्टेडिअमच्या आत फेकला. पोलार्डने हा षटकार 19व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मारला होता. हे षटक टॉम करन टाकत होता.

डेझर्ट वायपर्स संघाच्या डावात गोलंदाजी करताना एमिरेट्सकडून फजलहक फारूकी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त जहूर खान आणि इम्रान ताहिर यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, ट्रेंट बोल्ट, ड्वेन ब्रावो आणि डॅन मुसली यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (ilt20 kieron pollard dan mousley hit a six outside the stadium fan run away with ball during ilt20 league match see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
म्हारी छोरियां छोरों से कम हैं के! वर्ल्डकप विजयानंतर भारतीय महिलांचा ‘काला चष्मा’वर धमाल डान्स
पहिल्या दोन टी20त फ्लॉप ठरलेल्या गिल-ईशानपैकी कुणाच्या जागी मिळावी पृथ्वीला संधी? जाफरने स्पष्टच सांगितलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---