पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात सातत्याने अनेक वादग्रस्त घटना घडत असतात. फिक्सिंग आणि गटबाजीच्या घटनांचा वारंवार उलगडा होत असतो. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू अशी काही वक्तव्य करतात ज्यामुळे वाद ओढवून घेतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदीर्घ कालावधीसाठी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलेला माजी क्रिकेटपटू इम्रान नजीर हा आता अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. आपण क्रिकेट खेळत असताना आपल्याला विष देण्यात आल्याचा दावा त्याने केला.
नजीर याने नुकतीच एका युट्युब चॅनलवर मुलाखत दिली. यावेळी त्याने काही धक्कादायक खुलासे केले. आपण क्रिकेट खेळत असताना आपल्याला कोणीतरी विष दिल्याचे त्याने म्हटले. तो म्हणाला,
“काही दिवसांपूर्वी मी तब्येतीच्या कारणास्तव हॉस्पिटलमध्ये गेलो असता मला एक गोष्ट समजली. मला कुणीतरी पारा खाऊ घातलेला. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हे स्लो पॉयझन असते. मला सात आठ वर्षे या गोष्टीचा त्रास झाला. मात्र, हे नक्की कोणी केले याबाबत काही माहित नाही.”
नजीर पुढे बोलताना म्हणाला,
“कारकीर्द संपल्यानंतर माझा बराच वेळ हॉस्पिटलमध्ये गेला. मी क्रिकेट खेळून जी काही संपत्ती कमावली होती ती सर्व माझ्या उपचारांवर खर्च झाली. ज्यावेळी माझ्याकडे काहीच नव्हते त्यावेळी मी शाहिद आफ्रिदीकडे मदत मागितली. त्याने देखील मनाचा मोठेपणा दाखवत माझ्यावर 50-60 लाख रुपयांचा खर्च केला. यासाठी मी आयुष्यभर त्याचा ऋणी राहील.”
इम्रान नजीर हा पाकिस्तानचा आक्रमक सलामीवीर म्हणून ओळखला जात होता. टी20 क्रिकेटमध्ये त्याने चांगली प्रसिद्धी मिळवली होती. मात्र, त्याची कारकीर्द अकाली संपली. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचे 112 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले होते.
(Imran Nazir Statement Someone Give Me Slow Poison Shahid Afridi Save Me)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटमध्ये राजकारण! सूर्याच्या फ्लॉप शोमुळे काँग्रेस नेत्याचा बीसीसीआयवर निशाणा, सॅमसनला मिळाला सपोर्ट
वनडेतील 265 डावांनंतरही चमकतोय ‘किंग’ कोहली, पठ्ठ्याची सरासरी आहे सचिन अन् धोनीपेक्षाही जास्त; वाचाच