ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार स्टिवन स्मिथ एक चिवट फलंदाज म्हणून ओळखला जातो. तो कसोटी क्रिकेटमधील मॉडर्न लिंजड असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. शुक्रवारी याच स्मिथने गॉल कसोटी श्रीलंकेविरुद्ध कसोटीतील २८वे शतकं केले. स्मिथ जसा खोऱ्याने धावा करतो, तसाच तो त्याचे पैसे चलाखीने गुंतवतो, हे अनेकांना माहित नाही.
स्टिवन स्मिथने वयाच्या २७व्या वर्षी एका ऑस्ट्रेलियन कंपनीत १ लाख डॉलरची गुंतवणूक केली होती. २०१५ साली त्याने त्याचा परिवार व मॅनेजरच्या सल्ल्याने ही गुंतवणूक केली होती. मट्रेसेस (चटई) रिलेटर असलेल्या कोअला मॅट्रेसेसमध्ये त्याने ही गुंतवणूक केली होती. पुढे २०१९मधील एका रिपोर्ट नुसार स्मिथच्या या १ लाख डॉलरचे तब्बल १२.१ मिलीयन डॉलर अर्थात ६० कोटी रुपये झाले होते. या कंपनीने केवळ ५ महिन्यांतच १ मिलीयन डॉलरचा व्यवसाय २०१५मध्ये केला होता. २०१९ पर्यंत या कंपनीचे २ लाख ग्राहक झाले होते व जवळपास ७५० कोटी रुपये या कंपनीचे मुल्य झाले होते.
स्मिथ या कंपनीचा ब्रॅंड ॲंबेसिडर देखील आहे. त्याच्या नावाचा कंपनीला अनेकवेळा फायदा देखील होत असतो. या कंपनीचे जवळपास १० टक्के स्टेक्स ही स्मिथकडे आहे. स्मिथच्या बॅटवर अनेक वेळा या कंपनीचा स्टिकरही दिसत असतो.
Steve Smith’s cricket bats for the upcoming season. Koala is a mattress company.@NBCricket @KoalaMattress pic.twitter.com/zPLtZU6kFO
— Cricket Business (@CricketBusiness) September 24, 2018
२०१९मध्ये जेव्हा स्मिथवर बंदी आली तेव्हा त्याचे जवळपास ७ मिलीयन डॉलरचे नुकसान झाले होते. अशावेळी आर्थिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी त्याला याच कंपनीने मदत केली होती. एका ऑस्ट्रेलियन माध्यमाला स्मिथने मुलाखतीमध्ये त्याचे व्यावसायिक इरादे स्पष्ट केले होते. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर त्याला बिझनेसमन किंवा गुंतवणूकदार बनण्याचे त्याने सांगितले होते. त्याने २०१६मध्ये स्नॅप्र नावाच्या एका कंपनीत ४ टक्के शेअर्ससाठी १ लाख डॉलरची गुंतवणूकही केली आहे. स्नॅप्र ही ऑनलाईन फोटोग्राफी प्लॅटफॉर्म आहे. ही कंपनी अमेरिकेतून त्यांचा व्यवसाय सांभाळते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिंधूवर भारी पडतीये ‘ही’ खेळाडू, सलग सातव्यांदा स्विकारावा लागला पराभव
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनी म्हणजे भारतीय क्रिकेटमधील मानाचा तुराच
‘सर, मी जास्त डोकं लावत नाही’, पत्रकाराने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर हार्दिक पंड्याचं भारी उत्तर