---Advertisement---

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत होणाऱ्या आयपीएल सामन्यांविषयी आली महत्त्वाची अपडेट, वाचा सविस्तर

On: शनिवार, एप्रिल 24, 2021 7:39 PM
---Advertisement---

कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेने पुन्हा एकदा देशात थैमान घातले आहे. बहुतेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊन जाहीर केली आहेत. रुग्णालये रूग्णांनी भरलेली दिसत आहेत. दरम्यान, बातमी येत आहे की, दिल्लीत होणारे आयपीएल २०२१ चे सामने नियोजित वेळापत्रकानुसार खेळविले जातील. दिल्ली कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित शहरांपैकी एक आहे. २२ एप्रिल पर्यंत शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ३०० पर्यंत गेली आणि २६ हजार नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. सध्या देशाच्या राजधानीतील रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनचा अभाव आहे.

हे संघ खेळणार दिल्लीत
गतविजेते मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे आयपीएलचे चार संघ दिल्ली येथे २८ एप्रिलपासून अरुण जेटली स्टेडियमवर एकूण ८ सामने खेळणार आहेत. मुंबईचा संघ टीम २४ एप्रिलला दिल्लीत पोहोचेल. तर, उर्वरित संघ २६ एप्रिलपर्यंत येथे पोहोचतील. अरुण जेटली स्टेडियमचे संचालन पाहणाऱ्या दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आयपीएलसाठी तयार केलेल्या जैव-सुरक्षित वातावरणावर विश्वास आहे.

सर्व सामने वेळेत होतील
एका प्रमुख वृत्तपत्राच्या बातमीनुसार, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी स्पष्ट केले आहे की, “दिल्लीतील सर्व सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील. बायो बबलचे सर्व नियम पाळून हे सामने खेळविण्यात येणार आहेत. मी बबलचा भाग नसलो तर, मला मैदानावर प्रवेश करता येणार नाही. वातावरण अगदी सुरक्षित आहे. ग्राउंड स्टाफसह संघटनेचे पदाधिकारी बबलचा भाग असतील.”

आयपीएलसाठी आपत्कालीन परिस्थितीत बीसीसीआयने हैदराबाद आणि इंदोर ही दोन राखीव मैदाने तयार ठेवली आहेत.

चारही संघाची आहे अशी अवस्था
दिल्लीत सामने खेळणारे चारही संघ दिल्लीत प्रत्येकी तीन सामने खेळतील. चेन्नई सुपर किंग्स सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्सने दोन विजय आणि तीन पराभवासह पाचवी स्थान राखले असून, एका विजयासह सनरायझर्स हैदराबाद सहाव्या तर राजस्थान रॉयल्स खराब धावगतीमुळे एक विजय मिळवून अखेरच्या स्थानी विराजमान आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

जिंकलस भावा! वाढदिवसाच्या दिवशी सचिनने केला खास संकल्प करत दिला स्तुत्य सामाजिक संदेश, व्हिडिओ व्हायरल

सचिनची खोड काढणे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पडले होते महागात, चाहत्याने दिले होते असे उत्तर!

व्हिडिओ : मुंबईला धूळ चारल्याने गेल आनंदी, म्हणतोय ‘मोगॅम्बो खुश हुआ’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---