भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL)यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना भारताने 2 धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या काही भारतीय खेळाडूंना आयसीसी टी20 क्रमवारीत जबरदस्त फायदा झाला आहे. ताज्या आयसीसी टी20 क्रमवारीत भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya),सलामीवीर ईशान किशन यांच्यासह दीपक हुडा (Deepak Hooda)यालाही फायदा झाला आहे.
ईशानने फलंदाजांच्या क्रमवारीत 10 स्थानांनी उडी घेत 23वे स्थान गाठले आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20मध्ये 37 धावा केल्या होत्या. त्यानंतर हुडालाही क्रमवारीत फायदा झाला आहे. तो ताज्या क्रमवारीनुसार फलंदाजांच्या क्रमवारीत 97व्या स्थानावर आला आहे. हार्दिकने गोलंदाजाच्या क्रमवारीत 10 स्थानांनी झेप घेतली आहे. तो आता 76व्या स्थानावर आहे.
या क्रमवारीत श्रीलंकेच्या खेळाडूंनाही लाभ झाला आहे. त्यांचा उपकर्णधार वानिंदू हसरंगा याने अष्टपैलूच्या क्रमवारीत दोन स्थानांनी उडी घेत पाचवे स्थान गाठले आहे. त्याने भारताविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात एक चौकार आणि 2 षटकार मारत 10 चेंडूत 21 धावांची खेळी केली होती. तसेच त्याने एक विकेटही घेतली होती.
क्रिकेटविश्वात दुसरीकडे कसोटी सामनेही सुरू आहेत. सध्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामने सुरू आहेत. यामुळे कसोटीमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने शतकी खेळी करत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला मागे टाकले आहे. त्याने दुसरे स्थान गाठले आहे. तर पहिल्या स्थानावर मार्नस लॅब्यूशेन पहिल्या स्थानावर कायम आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याला मात्र क्रमवारीत नुकसान झाले आहे. तो तीन स्थानांनी खाली घसरुन सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. यामुळे भारताच्या जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांना प्रत्येकी एक-एक स्थानांनी फायदा झाला आहे. बुमराह तिसऱ्या आणि अश्विन चौथ्या स्थानावर आले आहेत. तसेच इंग्लंडचा ऑली रॉबिनसन हा पण पाचव्या स्थानावर आला.
(In ICC Men T20 Latest Rankings Hardik Pandya Ishan Kishan benefit in Test Smith overtakes Babar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टीव स्मिथने उद्ध्वस्त केला दिग्गज डॉन ब्रॅडमनचा विक्रम, विराट अन् रुटही पाहतच राहिले
VIDEO: 19 वर्षांपूर्वी सचिनने खेळलेली मॅरेथॉन इनिंग; मात्र द्विशतकादरम्यान मारला नव्हता एकही कव्हर ड्राईव्ह