नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी मोठा विजय मिळवला.
हा विजय मिळवताच पुन्हा एक योगायोग या सामन्यात पहायला मिळाला. भारताने यावर्षीच्या सुरुवातील दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता.
त्या दौऱ्यात टीम इंडियाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते तर तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला होता. त्या मालिकेतील पहिला सामना भारत केवळ ७२ धावांनी पराभूत झाला होता.
इंग्लंड दौऱ्यातही असेच घडले आहे. पहिला सामना टीम इंडिया केवळ ३१ धावांनी पराभूत झाली तर दुसऱ्या सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. तिसरा कसोटी सामना जबरदस्त कमबॅक करत टीम इंडिया जिंकली.
भारत दक्षिण आफ्रिकेत जो तिसरा सामना जिंकली त्यात विराट कोहलीने पहिल्या डावात ५४ तर दुसऱ्या डावात ४१ धावा केल्या होत्या तर बुमराहने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात २ विकेट्स घेतल्या होत्या.
आज संपलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही विराटने पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात १०३ धावा केल्या आहेत. तसेच बुमराहने पहिल्या डावात २ तर दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अखेर कोहलीच्या टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला पाजले पाणी
–कसोटी सामन्यात संपुर्ण दिवसात टाकले गेले होते केवळ दोन चेंडू
–पाचव्या दिवशी १ विकेट बाकी असताना यापुर्वी १० सामन्यांत नक्की काय झाले होते?