आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दरमहिन्याला सर्वोत्तम महिला आणि पुरुष खेळाडूचा पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार जून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराच्या विजेत्या खेळाडूंची नावे सोमवारी (१२ जुलै) जाहीर करण्यात आली आहेत. जून महिन्यातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून इंग्लंड संघाची फिरकीपटू सोफी इक्लेस्टोनला निवडण्यात आले आहे. तर सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेची निवड झाली आहे.
जून महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार मिळवण्यासाठी इक्लेस्टोनसह भारताची युवा फलंदाज शेफाली वर्मा आणि अष्टपैलू स्नेह राणा या देखील शर्यतीत होत्या. पण इक्लेस्टोनने त्यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार मिळवणारी इक्लेस्टोन ही इंग्लंडची दुसरी महिला खेळाडू असून तिच्या अगोदर फेब्रुवारीमध्ये टॅमी ब्यूमॉन्टला हा पुरस्कार मिळाला होता.
इक्लेस्टोन जून महिन्यात पार पडलेल्या भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. या सामन्यात 25.75 सरासरीने 8 विकेट घेतल्या. तिने दोन्ही डावात प्रत्येकी 4 विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर दोन एकदिवसीय 12.16 च्या सरासरी आणि 3.65 च्या इकोनॉमी रेटने 6 बळी घेतले होते.
आयसीसीशी बोलताना इक्लेस्टोन म्हणाली की, ‘हा पुरस्कार मला मिळाला असून मला याचा खरोखर खूप आनंद होत आहे. या दौऱ्यात आम्ही तीन प्रकारात खेळलो होतो आणि कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकेतल्या मी केलेल्या कामगिरीचा गौरव झाला, याचा मला खूप आनंद झाला आहे.’
A bucketload of wickets in June means this England star was voted the women's #ICCPOTM winner! 🥇 pic.twitter.com/zFtAt8D0L9
— ICC (@ICC) July 12, 2021
कॉनवेने जेमिसन आणि डीकॉकला टाकले मागे
पुरुष गटामध्ये जून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकणाऱ्या न्यूझीलंडच्या सलामीवीर फलंदाज डेवोन कॉनवेने वेगवान गोलंदाज काइल जेमीसन आणि दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक यांना मागे टाकले आहे. जेमिसन आणि डी कॉकलाही या पुरस्कारासाठी नामांकन होते.
🔸 WTC21 champion
🔸 Double century on Test debutThis @BLACKCAPS star has been voted the men's #ICCPOTM for June 🏆 pic.twitter.com/bMVGduhabL
— ICC (@ICC) July 12, 2021
डेवोन कॉनवे हा पुरस्कार जिंकणारा न्यूझीलंड संघाचा पहिला खेळाडू आहे. डावखुरा फलंदाज डेवोन कॉनवेने जून महिन्यामध्ये लॉर्ड्स येथे कसोटी पदार्पणात दुहेरी शतक झळकावले. पुढील दोन कसोटी सामन्यात त्याने दोन अर्धशतके झळकावली. ज्यात भारताविरुद्ध आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्याचा समावेश आहे. त्याने या महिन्यात ३ कसोटीत 63.16 च्या सरासरीने 379 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
कधीकाळी चौकार-षटकार ठोकणारी बार्टी बनली विम्बल्डन विजेती; आयसीसीने खास व्हिडिओसह केले अभिनंदन
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळूनही ‘या’ क्रिकेटपटूंनी टाकला नाही एकही चेंडू