---Advertisement---

युरो कपच्या अंतिम फेरीत पराभव झाल्यानंतर ‘त्या’ खेळाडूंवर वर्णभेदी शब्दांत टीका, पंतप्रधानांना द्यावी लागली सफाई

---Advertisement---

लंडन येथील वेंबली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या युरो कप २०२० च्या अंतिम सामन्यात इंग्लंडला इटलीकडून पराभवाचा सामना करावा लागला. पेनल्टी शूटआउटमध्ये गेलेल्या या सामन्यात इटलीने ३-२ असा विजय मिळवला. यासोबतच इंग्लंडचे पहिले युरो विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र, या पराभवानंतर काही इंग्लिश नागरिकांनी पेनल्टी चुकलेल्या खेळाडूंवर वर्णभेदी टीका केली. त्यानंतर, स्वत: इंग्लंडच्या पंतप्रधानांना या मुद्द्यावर समोर येऊन प्रतिक्रिया द्यावी लागली.

या खेळाडूंकडून चुकली पेनल्टी
अत्यंत रोमांचक झालेला हा अंतिम सामना निर्धारित वेळेत तसेच एक्स्ट्रा टाइममध्ये १-१ अशा बरोबरीत सुटला. त्यानंतर पेनल्टी शूट आउटद्वारे सामन्याचा निकाल लागला. पाचपैकी तीन पेनल्टी साधून इटलीने विजेतेपद आपल्या नावे केले. त्याचवेळी इंग्लंडच्या केवळ कर्णधार हॅरी केन व हॅरी मॅग्वायर यांना पेनल्टी साधता आली.

इंग्लंडकडून मार्कस रॅशफोर्ड, जेडन सॅन्चो व १९ वर्षीय बुकायो साका या खेळाडूंना पेनल्टी साधण्यात अपयश आले. विशेष म्हणजे हे तिन्ही खेळाडू कृष्णवर्णीय आहेत. त्यामुळे या तिघांवर इंग्लंडच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावर वर्णभेदी शब्दांमध्ये टीका करण्यास सुरुवात केली. हा अंतिम सामना खेळण्यापूर्वी दोन्ही संघांनी गुडघ्यावर बसून वर्णद्वेषाविरुद्ध लढा देण्याची शपथ घेतली होती.

रॅशफोर्ड हा सेंट किट्स, सॅन्चो हा त्रिनिदाद तर साका नायजेरियन वंशाचा आहे. पेनल्टी चुकल्यानंतर या तिघांना इंग्लंड सोडण्याची तसेच आपल्या देशात जाण्याचे सोशल मीडियावरून सल्ले देण्यात आले.

पंतप्रधानांनी दिली प्रतिक्रिया
खेळाडूंवर झालेल्या या टिप्पणीनंतर इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ट्विट करत प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘इंग्लंडचा संघ सोशल मीडियावर वर्णभेदी टिका नव्हेतर, कौतुक करण्यास पात्र आहे. अशा प्रकारे दुर्व्यवहार करणाऱ्या लोकांना स्वत:वर शरम वाटायला हवी.’

यानंतर, इंग्लंड फुटबॉल असोसिएशनकडून देखील या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या – 

अर्जेंटिनाने जेतेपद पटकावल्याने मुलगा कपडे काढून करू लागला डान्स, वडिलांनी खुर्चीने दिला चोप

युरो कप: तब्बल ५३ वर्षांनंतर इटलीने पटकावले विजेतेपद, इंग्लंडचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव

अंतिम सामना गमावल्यानंतर रडू लागला नेमार, मैदानातील वैर विसरुन मेस्सीने दिली गळाभेट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---