फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे, यात काही शंकाच नाही. हा खेळ जगातील प्रत्येक देशात खेळला जातो. त्याच बरोबर या खेळाला पसंत करणारे चाहते जगाच्या प्रत्येक काना कोप-यात पसरलेले आहेत. काही चाहते तर फुटबॉलसाठी इतके वेडे असतात की, कधी स्टेडियममध्ये किंवा बाहेर अनोख्या पद्धतीने आपल्या आवडत्या संघावर किंवा फुलबॉलपटूवर प्रेम आणि द्वेष व्यक्त करत असतात.
परंतु सध्या कोरोनामुळे मर्यादित लोकांनाच स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळेच कोपा अमेरिका अंतिम सामना पाहण्यासाठी जास्त गर्दी दिसून आली नव्हती. मात्र अनेकांनी आपापल्या घरातून टिव्हिवर हा सामना पाहत जल्लोष साजरा केला.
कोपा अमेरिका अंतिम सामन्यामुळे वडिलांचे व मुलाचे भांडण
अर्जेंटिना विरुद्ध ब्राजील यांच्यात झालेला अंतिम सामना जिंकत अर्जेंटिनाने 28 वर्षांनंतर कोपा अमेरिकाचे विजेतेपद मिळवले. या अंतिम सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अगदी भारतातही सर्वांचे या सामन्याकडे लक्ष होते. कारण हा सामना अर्जेटिना आणि ब्राझीलचा नसून स्टार फुलबॉलपटू आणि माजी सहकारी मेस्सी विरुद्ध नेमारचा होता. याचदरम्यान एका कुटूंबाचा असा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे कोणालाही हसू येईल.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बाप-मुलामध्ये मजेदार भांडण पाहायला मिळाले. त्याचे झाले असे की, मेस्सीचा चाहता असलेला मुलगा अर्जेंटिनाच्या विजयानंतर आपला टीशर्ट काढून आनंद साजरा करत होता. तो मुद्दाम आपल्या वडिलांपुढे जाऊन नाचत होता. कारण त्याचे वडील हे नेमारच्या ब्राजील संघाचे समर्थक होते. मुलाची हरकत पाहून निराश झालेल्या वडिलांनी स्वत:वर काही प्रमाणात नियंत्रण ठेवले होते. परंतु काही वेळाने त्यांनी नियंत्रण गमावले आणि जवळची खुर्ची घेऊन आपल्या मुलाला मारण्यास त्याचाकडे धावले. मुलाच्या नृत्याने आणि वडिलांच्या रागाने सर्व नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत.
An #Argentina ???????? fan celebrating in front of his father who is a #Brazil ???????? fan ????????https://t.co/SkA80xl1JE
— infosfcb (@infosfcb) July 11, 2021
दुसरीकडे कोलकातामध्ये अर्जेंटिनाचा विजय एखाद्या सणाप्रमाणे साजरा केलेला दिसून आला. लिओनेल मेस्सीने 15,000 किमी अंतरावर कोपा अमेरिका करंडक जिंकल्यामुळे कोलकाताच्या अर्जेंटिना समर्थक संघ आनंदाने उड्या मारताना आणि नाचताना दिसला. रविवारी पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेल्या अंतिम सामन्याच्या युद्धात अर्जेंटिनाने कट्टर प्रतिस्पर्धी ब्राझीलचा 1-0 ने पराभूत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दिप्तीने चेंडूला हातही न लावता इंग्लंडच्या कर्णधाराला केले धावबाद; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘गजब!’
क्या बात! क्रिकेट खेळून देशसेवा केल्यानंतर, आता ‘हा’ क्रिकेटपटू बनलाय आर्मीमध्ये मेजर
‘गुरुजी इतरांकडून चँपियन बनण्याचे धडे घेतायत’; विम्बल्डन फायनल पाहायला गेलेले शास्त्री झाले ट्रोल