---Advertisement---

अररर! केवळ ५ षटकात टीम इंडियाने सोडले २ झेल, रनआऊटची संधी अन् २ रिव्ह्यूही गमावले

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 3:40 PM
---Advertisement---

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून सुरु झाला आहे. एमए चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांवर इंग्लंडच्या फलंदाजांनी वर्चस्व ठेवले आहे. विशेषत: इंग्लंडचा कर्णधार जो रुटने. दरम्यान, पहिल्या डावात भारतीय संघातील खेळाडूंकडून क्षेत्ररत्रणावेळी काही चूका झाल्या. एवढेच नाही तर डिआरएस रिव्ह्यूही चूकले आहेत.

विशेष म्हणजे इंग्लंडच्या पहिल्या डावात १०८ ते ११२ या षटकांदरम्यान भारतीय संघाने चक्क २ रिव्ह्यू गमावले, एवढेच नाही तर २ झेलही सोडले आणि १ धावबाद करण्याची संधीही गमावली.

पहिल्यांदा १०८ व्या षटकात भारतीय संघाने बेन स्टोक्स ३१ धावांवर खेळत असताना आर अश्विनच्या गोलंदाजीवर पायचीतसाठी अपील केले. मात्र, मैदानावरील पंचांनी नाबाद दिल्यानंतर भारताने रिव्ह्यूची मागणी केली. यामध्ये चेंडू स्टोक्सच्या ग्ल्व्हजला लागलेला दिसला. त्यामुळे त्याला नाबाद दिले.

त्यानंतर लगेचच पुढच्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताने १४७ धावांवर खेळत असलेल्या रुटविरुद्ध नदीमच्या गोलंदाजीवर  पायचीतसाठी अपील केले. यावेळीही मैदानावरील पंचांनी नाबाद दिल्याने भारताने रिव्ह्यू घेतला. पण रिव्ह्यूमध्ये रुट नाबाद असल्याचे दिसले.

यानंतर ११० व्या षटकात आर अश्विनने स्वत:च्याच गोलंदाजीवर स्टोक्सचा झेल घेण्याची संधी सोडली. त्यानंतर १११ व्या षटकात शहाबाज नदीमच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराने स्टोक्सचा अवघड झेल सोडला. इतकेच नाही तर ११२ व्या षटकात रुटला धावबाद करण्याची संधीही भारताने गमावली. हे कमी की काय, भारताने तिसरा रिव्ह्यू १३९ व्या षटकात गमावला.

महत्त्वाच्या बातम्या –

INDvsENG: सलग तीन कसोटीत जो रुटची दीडशतकी खेळी, दिग्गजांच्या मांदियाळीत केला प्रवेश 

इंग्लंडच्या कॅप्टनचा दीडशतकी धमाका, ब्रॅडमन यांच्या ८४ वर्षांपुर्वीच्या विक्रमाची केली पुनरावृत्ती

क्रिकेट.. क्रिकेट.. आणि फक्त क्रिकेटच, पाहा पुढील दोन वर्षांचे वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---