कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्याची परिस्थिती उद्भवली आहे. या व्हायरसला नष्ट करण्यासाठी भारत सरकारने २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. क्रीडाजगत एकप्रकारे ठप्प झाले आहे. त्यामुळे खेळाडू आपल्या परिवारासोबत घरातच वेळ घालवत आहेत. अनेक क्रिकेटपटू सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आहेत. तसेच आपल्या फीटनेसचीही काळजी घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी इंग्लंड संघाचा माजी फलंदाज आणि समालोचक केविन पीटरसनने (Kevin Pietersen) भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माबरोबर (Rohit Sharma) इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ कॉल केला होता. यादरम्यान पीटरसनने रोहितला प्रश्न विचारला की, “भारतीय संघाच्या कोणता खेळाडू या लॉकडाऊनचा सर्वात जास्त तिरस्कार करत असेल?, असे तुला वाटते.”
यावर उत्तर देत रोहित म्हणाला की, “जे खेळाडू एकटे म्हणजेच ‘सिंगल’ आहेत, त्या खेळाडूंना बाहेर जावे असे वाटत असेल. हे सर्व खेळाडू सेल्फी, व्हिडिओ पोस्ट करतात. मला असे वाटते की, जर यावेळी लॉकडाऊनमध्ये (Lockdown) सर्वात जास्त कोणाला बाहेर जावे असे वाटत असेल तर ते भारतीय संघाचे ‘सिंगल’ (Single) खेळाडू आहेत.”
सध्या प्रत्येक क्रिकेटप्रेमींना एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे आयपीएल (IPL 2020) केव्हा होणार? सध्या आयपीएल होण्याची चिन्हे खूप कमी आहेत. कारण कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. तसेच या व्हायरसची लागण होणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे.
पीटरसनच्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित म्हणाला की, कोरोना व्हायरसला (Corona Virus) नष्ट केल्यानंतर आणि परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर बीसीसीआय (BCCI) जगातील सर्वात महागडी टी२० क्रिकेट लीग आयपीएलचे आयोजन करू शकते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-अनेक शारिरिक कमी होत्या, तरीही हे ५ खेळाडू ठरले सर्वश्रेष्ठ
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे ५ खेळाडू
-क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारे ५ फलंदाज