क्रिकेटच्या मैदानात कधी कधी असे काही नजारे पाहायला मिळतात, जे पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत असतात. युरोपियन क्रिकेट लीगमध्ये असे प्रकार प्रामुख्याने घडताना दिसतात. त्याठिकाणचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत गोलंदाजाने स्लीप्समध्ये लावलेल्या खेळाडूंची संख्या पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे.
यूरोपीयन क्रिकेट लीगमध्ये रोमानिया आणि नॉर्वे संघात हा सामना खेळला गेला. सामना चर्चेत येण्याचे कारण ठरले नॉर्वेच्या गोलंदाजने स्लीप्समध्ये क्षेत्ररक्षणासाठी लावलेले खेळाडू. त्याने एक दोन नाही, तर तब्बल 9 खेळाडू स्लीप्समध्ये उभे केले होते. विशेष म्हणजे एवढे खेळाडू स्लीप्समध्ये उभे करून देखील गोलंदाजाच्या हाती यश मात्र आले नाही. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या वेगवेगळ्या आणि मजेशीर प्रतिक्रिया देखील यावर पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ पाहाणारा प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
क्रिकेटच्या मैदानात गोलंदाज शक्यतो जास्तीत जास्त 4 खेळाडूेंना स्लीप्समध्ये उभा करतो, हे आपण यापूर्वी पाहत आला आहोत. पण या सामन्यात गोलंदाजाने चक्क 9 खेळाडूंना स्लीप्समध्ये उभे केले आहे. हे पाहून खेळपट्टीवर स्ट्राईकवर उभा असलेला फलंदाज आणि नॉनस्ट्राईवरील फलंदाज देखील हैराण झाले होते. असे असले तरी, स्ट्राईकवरील फलंदाजाने ऑफ साईडला शॉट मारून धावा घेतल्या. दुसरीकडे गोलंदाजाच्या या फिल्ड प्लेसमेंटने चाहत्यांचे मन जिंकल्याचेही दिसत आहे. गोलंदाजाने जेव्हा हे 9 खेळाडू उभे केले, तेव्हा त्याच्या स्वतःच्या चेहऱ्यावर देखील हसू उमटले होते.
https://www.instagram.com/p/CjY5deuB3BH/?utm_source=ig_web_copy_link
सामन्याचा विचार करायचा झाल्यास नॉर्वे संघाने प्रथम फलंदाजी केली. रोमानियाला विजयासाठी नॉर्वेकडून 98 धावांचे लक्ष्य मिळाले होते. 10 षटकांच्या या सामन्यात ग्रुप डीमध्ये नॉर्वेने ८ विकेट्सच्या नुकसानावर 97 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रोमानिया संघाने 10 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 54 धावांपर्यंत मजल मारू शकला. नॉर्वेसाठी रजा इकबाल 29 आणि प्रतिश थंगावदिवेल यांने 16 धावांची खेळी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कार्तिकनंतर ‘हा’ असणार टीम इंडियाचा फिनिशर? संघ व्यवस्थापनाने आताच दिली जबाबदारी
INDvSA: मालिका निर्णायक सामन्यात नाण्याचा कौल भारताच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन