भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील पहिला टी-20 सामना भारताने 8 विकेट्स राखून नावावर केला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर तितास साधून हिने भारतासाठी जबरदस्त गोलंदाजी केली आणि भारताच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. भारताने या सामन्यात विजयासाठी 142 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे संघाने एका विकेटच्या नुकसानावर आणि 17.2 षटकात गाठले.
तितास साधू (Titas Sadhu) हिला या सामन्यातील प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्कार दिला गेला. तिने चार षटकांच्या स्पेलमध्ये 17 धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तसेच लक्ष्याचा पाठलाग करताना भारतासाठी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि शेफाली वर्मा (Shefali Verma) यांनी अर्धशतकी खेळी केली. स्मृतीने 52 चेंडूत 54 धावांची खेळी करून जॉर्जिया वेअरहॅम हिला विकेट दिली. तर शेफालीने 44 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. जेमिमाह रॅड्रिग्ज हिनेही 6* धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. ऑस्ट्रेलियासाठी फिबी लिचफिल्ड हिने 32 चेंडूत 49 धावांची सर्वोत्तम खेळी या सामन्यात केली. एलिस पेरी हिने 30 चेंडूत 37 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त संघातील एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा गाठू शकली नाही. परिणामी ऑस्ट्रेलियन संघ 19.2 षटकांमध्ये 141 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. भारतासाठी तितास साधूव्यतिरिक्त श्रेयांका पाटील आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. रेणुका सिंग आणि अमनजोत कौर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
उभय संघांतील ही टी-20 मालिका तीन सामन्यांची आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना रविवारी (7 जानेवारी) आणि तिसरा सामना मंगळवारी ( जानेवारी) डी वाय पाटील स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. (In the first T20 match, Australia had to accept defeat by 9 wickets from India)
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): ऍलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फिबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, एनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, मेगन शट, डार्सी ब्राउन.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, तितास साधू.
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy 2024 । चुकीचा कामात सापडला ओडिसाचा खेळाडू, हंगामातील पहिल्याच सामन्यात कारकिर्दीचा शेवट!
BREAKING! ‘या’ तारखेला भिडणार भारत-पाकिस्तान, टी20 वर्ल्डकपचे वेळापत्रक घोषित