शनिवार (28 जुलै) रोजी भारत विरुद्ध श्रीलंका (India Vs Sri Lanka) 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं 43 धावांनी विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नव्या युगाची सुरुवात विजयासह झाली. तत्पूर्वी या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि श्रीलंकेचा सलामीवीर पाथुम निसांका (Pathum Nisanka) यांच्यामध्ये वादावाद पाहायला मिळाला.
श्रीलंकेच्या डावातील चौथ्या षटकात मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पाथुम निसांकानं जोरदार षटकार ठोकला. पाचव्या चेंडूवर सिराजनं पुनरागमन करत निर्धाव चेंडू फेकला. या चेंडूनंतर सिराज निसांकाला काहीतरी बोलताना दिसला. निसांकानं यावर उत्तर दिलं नाही. त्यानं यावर त्याच्या फलंदाजीसह प्रत्युत्तर दिलं. निसांकानं सिराजच्या ओव्हरच्या सहाव्या चेंडू शानदार षटकार मारला. तेव्हा सिराज फक्त या चेंडूकडे पाहत राहिला.
श्रीलंकेकडून सलामीवीर पाथुम निसांकानं (Pathum Nisanka) सर्वाधिक धावांची खेळी खेळली. त्यानं 48 चेंडूत 79 धावा ठोकल्या. यादरम्यानं त्यानं 7 चौकारांसह 4 षटकार ठोकले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 164.58 राहिला. श्रीलंकेसाठी सलामीवीर निसांका आणि कुसल मेंडिस (Kusal Mendis) यांनी सर्वाधिक धावा केल्या. परंतू संघाला सामना जिंकून देऊ शकले नाहीत. तर श्रीलंकेचा अन्य कोणताही फलंदाज 20 धावांपेक्षा जास्त धावांची खेळी करु शकला नाही. भारतानं पहिल्याच टी20 सामन्यावर वर्चस्व गाजवत श्रीलंकेचा धुव्वा उडवला. दोन्ही संघांमधील दुसरा टी20 सामना आज (28 जुलै) रोजी खेळला जाणार आहे.
पहिल्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
श्रीलंका- पाथुम निसांका, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महेश तीक्ष्णा, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या टी20 मधील विजयानंतर कर्णधार सूर्याचा आनंद गगनात मावेना; चक्क! असं काही बोलला…
भल्या भल्यानां नाही जमलं, ते हार्दिकनं करुन दाखवलं; ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
पॅरिस ऑलिम्पिक : हाॅकीमध्येही भारताची शानदार कामगिरी, न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव