भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने झाले. दोन्ही सामन्यांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला आणि या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तत्पूर्वी या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) 64 धावांची खेळी खेळून अनेक रेकाॅर्ड त्याच्या नावावर केले. त्यानं दिग्गज खेळाडूंना मागं सोडलं आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) सलामीवीर म्हणून 175 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्यानं सचिन तेंडुलकर, दिलशान, गांगुली आणि हाशिम आमला यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मागं टाकलं. रोहितनं 175 एकदिवसीय डावांमध्ये 8,801 धावा केल्या आहेत. तर हाशिम आमलानं 175 डावांनंतर 8,083 धावा केल्या होत्या. त्यानंतर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 175 डावांनंतर 7,841 धावा केल्या होत्या. सौरव गांगुलीनं 175 एकदिवसीय डावांनंतर 7,036 धावा केल्या.
सलामीवीर म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) या चारही दिग्गज खेळाडूंच्या पुढे निघून गेला. एवढंच नाही, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 175 डावांनंतर रोहितच्या नावावर 29 अर्धशतक आहेत. जे हाशिम आमला, सचिन तेंडुलकर, दिलशान, सौरव गांगुली या दिग्गज खेळाडूंपेक्षा जात आहत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 175 डावांनंतर सर्वाधिक धावा
8,801 – रोहित शर्मा
8,083 – हाशिम आमला
7,841 – सचिन तेंडुलकर
7,325 – तिलकरत्ने दिलशान
7,036 – सौरव गांगुली
रोहित शर्माचं (Rohit Sharma) वय सध्या 37 वर्ष, 97 दिवस आहे. त्यानं भारतासाठी आतापर्यंत 264 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 10,831 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 49.23 तर स्ट्राईक रेट 92.29 राहिला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 57 अर्धशतक, 31 शतक आणि 3 द्विशतक आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 264 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट विश्वात शोककळा! 100 कसोटी सामने खेळलेल्या दिग्गज फलंदाजाचं निधन
रविचंद्रन अश्विनच्या संघानं पहिल्यांदाच उंचावली टीएनपीएलची ट्राॅफी…!
ऐकावं ते नवलच…! खेळाडूनं हातानं नव्हे चक्क पायानं झेल घेतला; भन्नाट व्हिडिओ व्हायरल