भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणममध्ये खेळला जात आहे. मालिकेलीत पहिल्या सामन्यात भारताने पाच विकेट्स राखून विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात जर भारत विजयी झाला, तर वनडे मालिका देखील संघ नावावर करेल. पण दुसऱ्या सामन्याची सुरुवात संघाच्या मनाप्रमाणे होऊ शकली नाही. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
भारतीय संघाचा निमयित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात खेळला नाही. रोहितने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या वनडेतून माघार घेतली होती. रोहितच्या जागी पहिल्या वनडेत ईशान किशन (Ishan Kishan) डावाची सुरुवात करण्यासाठी आला होता, तर नेतृत्व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने सांभाळले होते. पण दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित खेळत असल्याने ईशानला प्लेइंग इलेव्हनमधील जागा गमवावी लागली. तकर दुसरीकडे हार्दिक पंड्यालाही कर्णधारपद सोडावे लागले. तसेच वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) याला संघात सामील केले गेले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शम.
🚨 Here's #TeamIndia's Playing XI 🔽
Follow the match ▶️ https://t.co/dzoJxTOHiK#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/UiyxF37ZH6
— BCCI (@BCCI) March 19, 2023
ऑस्ट्रेलिया: ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन ऍबॉट, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, ऍडम झंपा.
Australia XI: Travis Head, Mitchell Marsh, Steve Smith (c), Marnus Labuschagne, Alex Carey (wk), Cameron Green, Marcus Stoinis, Sean Abbott, Mitchell Starc, Nathan Ellis, Adam Zampa #INDvAUS
— cricket.com.au (@cricketcomau) March 19, 2023
(In the second Test, Australia won the toss and elected to bowl first)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPL 2023 । एलिस पेरीकडून स्मृती मंधानाचे कौतुक, जाणून घ्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलूला काय भावले
नजम सेठींची आश्चर्यकारक माहिती, ‘या’ बाबतीत पीएसएलने आयपीएलला टाकले मागे?