---Advertisement---

‘मुंबईकर’ एजाजने न्यूझीलंडसाठी खेळताना पाडले टीम इंडियाच्या डावाला खिंडार

On: शुक्रवार, डिसेंबर 3, 2021 7:05 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला. पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवेल, अशी पूर्ण शक्यता होती. मात्र, शेवटच्या दिवशी न्यूझीलंडच्या तळातील खेळाडूंच्या संयमी खेळीमुळे सामना अनिर्णीत झाला. त्यानंतर ३ डिसेंबरपासून कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला. भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघीची सुरुवात खूपच निराशाजन राहिली. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यातून पुनरागमन केले. मात्र, तो चांगली खेळी करू शकला नाही.

न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने पहिल्या दिवसी अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने भारतीय संघाची धावसंख्या ८० असताना ३ बळी घेतले. यामध्ये त्याने कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी चेतेश्वर पुजाराला शून्य धावांवर (डक) बाद केले. एजाज पटेलने या दोन्ही दिग्गजांना एकाच षटकात तंबूत पाठवले. पुजारा आणि विराट अनुक्रमे तीन आणि चार क्रमांकावर फलंदाजीसाठी आले होते. चार चेंडूंच्या अंतराने दोघे शून्य धावांवर तंबूत परतले.  दरम्यान ही पहिली वेळ नाही, जेव्हा भारतासाठी तीन आणि चार क्रमांकावर खेळणारे महत्वाचे फलंदाज  शून्यावर बाद झाले आहेत.

ही तिसरी वेळ आहे, जेव्हा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे भारतीय फलंदाज मायदेशात खेळताना कसोटी सामन्याच्या एकाच डावात शून्य धावांवर बाद झाले. यापूर्वी इंग्लंड संघाविरुद्ध १९५१-५२ साली कानपूरमध्ये कसोटी सामना झाला होता. या कसोटी सामन्यात देखील भारताचे तीन आणि चार क्रमांकाचे फलंदाज शून्य धावांवर बाद झाले होते. त्यानंतर मुंबईत १९९४-९५ मध्ये वेस्ट इंडीज संघाविरुद्ध खेळताना देखील तीन आणि चार क्रमांकाच्या फलंदाजांनी अशीच निराशाजनक कामगिरी केली होती.

दरम्यान, चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने पाच चेंडूंचा सामना केला. मात्र, तो या पाच चेंडूत एकही धाव करू शकला नाही. विराट कोहली काही दिवसांपासून विश्रांतीवर होता. त्याने न्यूझीलंडविरुद्ध या दुसऱ्या कसोटी सामन्यातून संघात पुनरागमन केले. विराट पुनरागमन केल्यानंतर चांगली खेळी करेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, विराटने चाहत्यांची निराशा केली. पुजाराची विकेट गेल्यानंतर विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि चार चेंडू खेळून शून्य धावांवर बाद झाला. एजाज याने शुबमन गिलला बाद करत न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले होते. त्याने भारताचा चौथा गडी श्रेयस अय्यर याच्या रूपात बाद केला. ‌

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---