वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस यजमान संघाच्या नावावर राहिला. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये हा सामना खेळला जात असून तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजने एकूण 67 षटकांमध्ये 143 धावा केल्या. यात कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने महत्वपूर्ण खेळी केली. हा सामना विराट कोहलीसाठी खास आहे कारण, हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 500वा सामना आहे. विराटसाठी महत्वाच्या असणाऱ्या या सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा ही फिरकीपटूंची जोडी मोठी कामगिरी करणार आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याने आपल्या 500वा आंतरराष्ट्रीय सामना नेहमी लक्षात राहण्यासाठी पहिल्या डावात शतक ठोकले. पण रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या गोलंदाजांच्या जोडीसाठीही हा सामना नेहमी लक्षात राहण्यासारखा बनू शकतो. यासाठी अश्विन आणि जडेजाला मिळून अजून चार विकेट्स घ्याव्या लागतील. असे झाले, तर ही जोडी अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांचा विक्रम मोडीत काढतील. हरभजन आणि कुंबळे या जोडीने 54 सामन्यांमध्ये 501 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे अश्विन आणि जडेजा यांच्या नावावर 498 विकेट्सची नोंद आहे. अजून दोन विकेट्स घेतल्यानंतर ते भारतासाठी 500 विरेट्स घेणारी दुसरी जोडी ठरतील.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेम्स अँडरसन (James Andrews) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यांची जोडी सर्वोत्तम ठरली आहे. या दोघांनी आतापर्यंत सोबत खेळलेल्या सामन्यांमध्ये 1034 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर क्रमांक येतो शेन वॉर्न (Shane Warne) आणि म्गेलन मॅकग्रा (Glenn McGrath) यांच्या जोडीचा. वॉर्न आणि मॅकग्राने एकत्र खेळताना 1001 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील या दुसऱ्या कसोटीचा विचार केला, तर भारतीय संघ तिसऱ्या दिवसाखेर 209 धावांनी पुढे आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 438 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरत तिसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडीजची धावसंख्या 5 बाद 229 धावा आहे. अश्विनने आतापर्यंत एक, तर जडेजाने दोन विकेट्स घेतल्या आहेत. (In Virat Kohli’s 500th match, Ravichandran Ashwin-Ravindra Jadeja can complete their 500 international wickets)
महत्वाच्या बातम्या –
महाराजा टी20 ट्रॉफी: मयंक-पडिक्कलला पछाडत हा ‘अनकॅप्ड’ झाला मालामाल, मनिष पांडेला…
विनेश-बजरंगला दिलासा! विना ट्रायल एशियन गेम्स खेळण्याचा मार्ग झाला मोकळा