पुणे (16 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज नाशिक विरुद्ध सातारा यांच्यात सामना रंगला. दोन्ही संघांनी संथ सुरुवात केली होती. त्यानंतर नाशिकच्या चढाईपटूंनी आक्रमक सुरू करत आघाडी मिळवली. बदली खेळाडू म्हणून आलेल्या ऋषिकेश गडाख ने उत्कृष्ट चढाया करत गुण मिळवले.
मध्यांतरापूर्वी नाशिक संघाने सातारा संघाला ऑल आऊट करत 20-09 अशी आघाडी मिळवली. ऋषिकेश गडाख ला शशिकांत बरकांड ने चांगली साथ दिली. तर नाशिक च्या बचावपटूंनी तर संपूर्ण सामन्यांत आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मध्यांतर नंतर नाशिक संघाने आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मजबूत केली होती. गणेश गीते व ज्ञानेश्वर शेळके ने हाय फाय पूर्ण केला.
नाशिक संघाने 52-15 असा सामना जिंकत तिसरा विजय मिळवला. ऋषिकेश गडाख ने सुपर टेन पूर्ण करत 16 गुण मिळवले. तर गणेश गीते ने या स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक 9 पकडीत गुण मिळवले. ज्ञानेश्वर शेळके ने पकडीत 6 गुण मिळवले. सातारा कडून कुणाल जाधव ने 5 गुण मिळवले. (In Yuva Kabaddi series, Nashik team one-sided victory over Satara team)
बेस्ट रेडर- ऋषिकेश गडाख, नाशिक
बेस्ट डिफेंडर- गणेश गीते, नाशिक
कबड्डी का कमाल – ज्ञानेश्वर शेळके, नाशिक
महत्वाच्या बातम्या –
‘थाला’ची बॅट दोन वर्षांपासून शांतच! धोनीनं आयपीएलमध्ये शेवटचं अर्धशतक कधी झळकावलं होतं?
Sarfaraz Khan । 6 लाखाचे डायरेक्ट 15 लाख! भारतासाठी पदार्पण केल्यानंतर सोशल मीडियावर सरफराजची हवा