भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव सध्या भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. उभय संघातील एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना रविवारी, 25 सप्टेंबर रोजी खेळला गेला. हा सामना चेन्नईमध्ये खेळला गेला असून नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी केली. इंग्लंडने घेतलेला फलंदाजीचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. कुलदीप यादवने शेवटच्या षटकांमध्ये हॅट्रिक घेत इंग्लंडला स्वस्तात गुंडाळले.
कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या सामन्यात भारतासाठी सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी करणारा खेळाडू ठरला. त्याने टाकलेल्या 10 षटकांमध्ये 51 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याच्या हॅट्रिकचा समावेश होता, ज्यामुळे न्यूझीलंड अ संघ अपेक्षित धावसंख्यापर्यंत देखील पोहोचू शकला. न्यूझीलंड अ संघाने 219 धावा करून 47 षटकांमध्ये सर्वच्या सर्व विकेट्स गमावल्या. शेवटच्या षटकांमध्ये कुलदीपने कमाल प्रदर्शन केले.
न्यूझीलंडच्या डावातील 47 व्या षटकात कुलदीपने लोगान व्हॅन बीक ((Logan Van Beek), जो वॉकर (Joe Walker) आणि जेकब डफी (Jacob Duffy) यांना एकापाठोपाठ चेंडूवर तंबूत धाडले. या षटकातील चौथ्या चेंडूवर लोगान 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर जो वॉकर आणि शेवटच्या चेंडूवर जेकब डफी यांनी शून्य धावांवर विकेट्स गमावल्या. परिणामी न्यूझीलंडचा संघ या षटकात सर्वबाद झाला. त्यांच्या संघासाठी जो कार्टरने सर्वात मोठी (72) धावांची खेळी केली. तसेच सलामीसाठी आलेल्या रचित रविंद्रने देखील 62 धावांचे योगदान दिले. या दोघांव्यतिरिकिती न्यूझीलंड अ संघाचा एकही फलंदाज 30 किंवा त्यापेक्षा जास्त धावांचे योगदान देऊ शकला नाही.
कुलदीप यादवने जरी चार विकेट्स घेतल्या असल्या, तरी संघातील इतर गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करत होते. फिरकी गोलंदाज राहुल चाहर आणि रवी बिश्नोई यांनी संघासाठी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तसेच वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि राज बावा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvsAUS | निर्णायक सामन्यात पाऊस करणार खोळंबा! हवामान खात्याने वर्तवलाय ‘असा’ अंदाज
तिसऱ्या टी20साठी रिषभ पंतचा पत्ता कट? जाणून घ्या कारण आणि भारताची संभावित प्लेईंग 11
झूलनला ‘परफेक्ट फेअरवेल’! सहकारी खेळाडूंनी खांद्यावर घेत दिली मानवंदना; पाहा व्हिडिओ