भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनेड मालिकेतून मैदानात शुक्रवारी (22 सप्टेंबरी) पुनरागमन केले. उबय संघातील वनडे मालिकेचा पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जात असताना शमीने जबरदस्त गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर शमीने आपल्या भेदक चेंडूवर स्मिथला क्लीन बोल्ड केले.
उभय संघातली या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या विकेटसाठी स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यात 94 धावांची भागीदारी झाली. पण वॉर्रनच्या रुपात ऑस्ट्रेलियाने दुसरी विकेट गमावली. सलामीवीर फलंदाज वैयक्तिक 52 धावा करून तंबूत परतला. वॉर्नर बाद झाल्यानंतर स्मिथ संयमी खेळ दाखवत होता. पण डावातील 22व्या षटकात मोहम्मद शणी याने त्यालाहा तंबूत धाडले. शमीच्या कोट्यातील हे पाचवे षटक असून षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने स्मिथचा त्रिफळा उडवला. स्मिथने 60 चेंडूत 41 धावा करून खेळपट्टी सोडली.
त्याआधी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिचेल मार्श अवघ्या 4 धावा करून डावातील पहिल्याच षटकात बाद झाला होता. मार्शची विकेट देखील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यालाच मिळाली होती. शमी मागच्या काही सामन्यापासून चांगल्या फॉर्ममध्ये असला, तर संघ व्यवस्थापनाकडून त्याला नियमितपणे प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली नाहीये. वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळला जाणार आहे. या महत्वाच्या स्पर्धेत धेखील शमी संघासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतो. (IND vs AUS 1st odi Mohammed Shami dismissed Steve Smith)
A beauty from Mohammad Shami as Steve Smith is bowled.
Departs after scoring 41 runs.
Live – https://t.co/H6OgLtww4N… #INDvAUS@IDFCFIRSTBank pic.twitter.com/Z2VYiBY1oK
— BCCI (@BCCI) September 22, 2023
पहिल्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, कॅमरून ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍडम झम्पा.
महत्वाच्या बातम्या –
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा
INDvsAUS: पहिल्या वनडेत टॉस जिंकून राहुलचा फिल्डिंगचा निर्णय, 5 भारतीय धुरंधराचे ताफ्यात पुनरागमन