---Advertisement---

IND VS AUS; ट्रेव्हिस हेडचं अर्धशतक ऑस्ट्रेलिया 11 धावांनी आघाडीवर, टीम इंडिया अडचणीत!

On: शनिवार, डिसेंबर 7, 2024 11:53 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूने खेळवली जात आहे. सामन्याचा दुसरा दिवस सुरू झाला असून ज्यामधील पहिले सत्र संपले आहे. हे  सत्र दोन्ही संघासाठी 50-50 राहिली. दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाने सामन्यात अप्रतिम पुनरागमन केले. ज्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदर कामगिरी केली. आहे. त्याने दुसऱ्या दिवशी कांगारूंच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. जस्सीने एक नाही तर 2-2 विकेट घेतल्या. या डावात जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या तिन विकेट्स घेतल्या आहेत. तर नितीशकुमार रेड्डीने एक बळी घेतला.

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 1 बाद 86 धावांवरून खेळाला सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्याच स्पेलमध्ये कांगारूंना धक्का दिला. त्याने पहिल्यांदा सेट फलंदाज नॅथन मॅकस्विनीला यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर त्याच पद्धतीने त्याने स्टीव्ह स्मिथला बाद केले. मॅकस्विनी 39 तर स्मिथ अवघ्या 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर लाबुशेन आणि ट्रेव्हिस हेड यांनी संघाला सावरले. दोघांनी 65 धावांची भागिदारी केली. या दोघांची भागिदारी डोकेदुखी ठरत असताना युवा नितीश कुमार रेड्डीने मार्नस लाबुशेनला बाद केले. लाबुशेन 64 धावांवर बाद झाला. तर आता लंच ब्रेक पूर्वी क्रीजवर मिशेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड आहेत. या बातमीआखेरीस यजमान संघाने 11 धावांची आघाडी घेतली आहे, तर संघ 191-4 अश्या स्थितीत आहे.

पहिल्या दिवशी भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय तितकासा प्रभावी ठरला नाही. भारतीय संघ अवघ्या 180 धावांवर ऑलआऊट झाला. मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरली. अगदी वरच्या क्रमवारीत फक्त केएल राहुल आणि शुभमन गिल हेच चांगले दिसले.

याशिवाय खालच्या मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या नितीश कुमार रेड्डी याने पुन्हा एकदा फलंदाजी करत सर्वांना प्रभावित केले. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने फलंदाजीत चांगली ताकद दाखवली. उस्मान ख्वाजा लवकर बाद झाल्यानंतर नॅथन मॅकस्वीनी आणि मार्नस लॅबुशेन यांनी डावाची धुरा सांभाळली.

हेही वाचा-

विदेशी मैदानावर हॅरी ब्रुकची दमदार कामगिरी, पोहोचला महान दिग्गजाच्या रेकाॅर्डजवळ
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 खेळाडू
दुसऱ्या डावात ‘या’ फलंदाजाला लवकर बाद करावे लागणार, मिचेल स्टार्कने स्पष्टच सांगितलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---