भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. मिचेल मार्शने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. शुबमन गिल सलग तिसरा टॉस हरला आहे.
भारतीय प्लेइंग XI मध्ये दोन मोठे बदल झाले आहेत. नीतिश कुमार रेड्डी आणि अर्शदीप सिंगच्या जागी कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा संघात सामील झाले आहेत. ऑस्ट्रेलियानेही एक बदल केला आहे. मालिकेच्या पहिल्या दोन सामने जिंकून 2-0 ने आघाडी असलेली यजमान संघाची नजर तिसरा सामना जिंकण्यावर असेल. तर शुबमन गिलच्या टीमसाठी व्हाईटवॉश टाळणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वनडे क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने आजपर्यंत भारताचा सूपडा साफ केलेला नाही. जर आज ऑस्ट्रेलियाने तिसरा वनडे जिंकला, तर हा शुबमन गिलच्या कर्णधारपदावर कलंक ठरेल.
भारत (प्लेइंग इलेवन):
रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेवन):
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अॅलेक्स कैरी (विकेटकीपर), कूपर कोनोली, मिचेल ओवेन, नाथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेजलवुड






