भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत आल्याचे दिसत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी अवघ्या 75 धावांची आवश्यकता आहे. भारताचा दुसरा डाव 163 धावांवर आटोपला. संघातील इतर फलंदाज अपयशी ठरले, पण चेतेश्वर पुजारा याने मात्र स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले. भारतासाठी विजय कठीण दिसत असला तरी पुजाराला मात्र गोलंदाजांवर विश्वास आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा दुसरा डाव संपला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने माध्यमांशी चर्चा केली. यावेळी पुजारा म्हणाला, “फलंदाजीसाठी ही खेळपट्टी कठीण आहे. खेळपट्टी सोपी नाहीये आणि अशात आपण डिफेंसवर (गोलंदाजांवर) विश्वास ठेवणे गरजेचे आहे. खेळपट्टीवर खेळत राहण्यासाठी तुम्हाला चेंडूपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तसेच शॉर्ड चेंडू बॅकफूटवर खेळला पाहिजे. 75 ही मोठी धावसंख्या नाहीये, पण तरीही विजयासाठी एक संधी आहेच.”
पुजारा पुढे स्वतःच्या फलंदाजीविषयी म्हणाला, “अशा खेळपट्टीवर तुम्ही डिफेंड करत राहिलात, तर एखादा चेंडू बाउंस होऊन तुमच्या ग्लव्जवर देखील लागू शकतो. तुम्ही आक्रमण आणि डिफेंस यामध्ये योग्य संतुलन राखले पाहिजे. मला जेव्हा कधी लुज चेंडू मिळाला, मी तो चेंडू स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याने (नेथन लायन) राउंड द विकेट गोलंदाजी केली, तेव्हा त्याची लाईन थोडी बदलली. तो ऑफ स्टंपऐवजी लेग स्टंपवर गोलंदाजी करत होता. मी फक्त स्ट्राईक रेटेट करत होतो. मला स्केअर लेगवर गोलंदाजी करायची होती, पण खेळपट्टी संथ गतीची असल्यामुळे चेंडू लेग स्टंपवर गेला. स्टीव स्मिथने अप्रतिम झेल पकडला.”
दरम्यान, उभय संघांतील या कसोटी सामन्याचे अजून तीन दिवस बाकी आहेत, पण भारतीय संघाचे दोन्ही डावा संपल्यामुळे ऑस्ट्रेलिया विजयाच्या अगदीच जवळ आहे. 75 धावा डिफेंड करणे भारतीय गोलंदाजांसाठी खूपच कठीण असेल. (ind vs aus 3rd test Cheteshwar Pujara’s special reaction after the second day’s play)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारे 4 खेळाडू; तीन भारतीय सोडले, तर लायन एकमेव ऑस्ट्रेलियन
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा ‘सम्राट’ बनला लायन! दोन भारतीयांना पछाडत कमावले सर्वोच्च स्थान