भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी ब्रिस्बेनमध्ये खेळवली जात आहे. परंतु पहिल्याच दिवशी हवामानाने खेळ केला. गाबा मैदानावर काळे आणि दाट ढग होते. त्यामुळे दिवस रात्रीसारखा गडद झाला होता. मुसळधार पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ 13.2 षटकांचा खेळ झाला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने देखील 28 धावा केल्या. तर या धावसंख्येपर्यंत यजमान ऑस्ट्रेलियाने एकही विकेट गमावलेली नाही. आता अश्या परिस्थितीत प्रश्न निर्माण होत आहे की, दुसऱ्या दिवशी ब्रिस्बेनमध्ये हवामान कसे असेल? दुसऱ्या दिवशीही पावसाचा व्यत्यय येणार की खेळाडू आणि चाहत्यांना मोकळ्या आकाशात खेळाचा आनंद घेता येणार आहे?
भारतीय आणि ऑस्ट्रेलियन चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की दुसऱ्या दिवशी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. हवामान अंदाच्या एका वेबसाइटनुसार, रविवारी पावसाची शक्यता केवळ 8 टक्के आहे. परंतु दिवसभर आकाश ढगाळ राहू शकते. असे असले तरी अनेक वेळा हलक्या पावसामुळे खेळ थांबण्याची शक्यता आहे. एकूणच दुसऱ्या दिवशीही संपूर्ण षटके क्वचितच टाकली जातील. सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात जोरदार वारे वाहत होते आणि दुसऱ्या दिवशीही ताशी 15 किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात.
पहिला दिवस गाबाचे मैदान तलावासारखे दिसत होते. खेळपट्टीभोवतीचे संपूर्ण मैदान पाण्याने भरलेले दिसत होते. गाबा मैदानाची ड्रेनेज व्यवस्था जागतिक दर्जाची आहे. मात्र रात्रीही उशिरा पाऊस झाल्यास दुसऱ्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होऊ शकतो. मैदानाची स्थिती लक्षात घेता दिवसाचा उर्वरित खेळ आता अर्धा तास आधी सुरू होईल. आता दिवसाचा उर्वरित खेळ भारतीय वेळेनुसार पहाटे 5.20 वाजता सुरू होईल आणि प्रत्येक दिवसाच्या षटकांची संख्या 98 करण्यात आली आहे.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
भारत – यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाशदीप
ऑस्ट्रेलिया – उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड
हेही वाचा-
वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर कॅरेबियन संघासोबत रंगणार थरार
गाबा कसोटी ड्रॉ राहिली तरी टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचणार! कसं ते जाणून घ्या
IND vs AUS: शेवटच्या चार दिवसांच्या खेळाच्या वेळेत बदल, गाबा कसोटीबाबत मोठे अपडेट समोर