भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळवला जात आहे. ज्यामध्ये पहिल्या दोन दिवसात कांगारुंचा दबदबा पाहायला मिळाला. कारण यजमान संघाने पहिल्या डावात 474 धावांचा डोंगर उभारला होता. ज्यामध्ये संघाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने शनदार शतक झळकावले. परिणामी दुसऱ्या डावात भारतीय संघाची खराब सुरुवात झाली. पण तिसऱ्या दिवसाखेर नितीश रेड्डी आणि वाँशिंग्टन सुंदर यांच्यातील शतकी भागीदारीच्या जोरावर संघाने सन्मानजक धावसंख्या उभारला. टीम इंडियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या. ज्यामुळे कांगारुंना 105 धावांची आघाडी मिळाली.
वास्तविक सामन्याच्या चाैथा दिवसाच्या टीम इंडियाकडून वेगळीच ऊर्जा पाहायला मिळत आहे. भारतीय गोलंदांजाच्या आक्रमणासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजी दडपणाखाली खेळताना दिसत आहेत. या दरम्यान मैदानावर विराट कोहलीचे वेगळेच रुप पाहायला मिळाले. तो संघाला लीड करताना भुमिकेत पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ-
Virat Kohli the Captain!!!! pic.twitter.com/DycGhCCPXr
— a (@kollytard) December 29, 2024
जरी रोहित शर्मा कर्णधार असला तरी विराट कोहली संघाचा चांगला लीडर आहे. रोहित शर्मा प्रमाणे तो ही संघाला लीड करतो. ज्याचा प्रत्यक्ष आजच्या सामन्यात पाहायला मिळाला. शिवाय कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघासाठी कर्णधार म्हणून अनेक सामने जिंकवले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाबद्दल बोलायचे झाल्यास संघाने 105 धावांच्या आघाडीसह खेळताना आतापर्यंत 135 धावा जोडल्या आहेत. मोबदल्यात संघाने 6 विकेट्स देखील गमावल्या असून सध्या क्रीझवर मार्नस लाबुशेन आणि कर्णधार पॅट कमिन्स खेळत आहेत. गोलंदाजीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स तर सिराजने 2 बळी टिपल्या आहेत.
हेही वाचा-
WTC फायनलच्या उंबरठ्यावर दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान पलटवार करणार?
IND vs AUS: नितीश रेड्डी कसोटीत हा पराक्रम करणारा पहिला खेळाडू, 6 डावातच रचला इतिहास
“जस्सी जैसा कोई नहीं..”, जसप्रीतची ‘बुम-बुम’ कामगिरी, मेलबर्न कसोटीत रचला इतिहास