---Advertisement---

ना आक्रमकपणा, ना कुठला धांगडधिंगा! विराटने कसोटीतील 28वे शतक ठोकल्यानंतर खास अंदाजात केले सेलिब्रेशन

On: रविवार, मार्च 12, 2023 2:43 PM
Virat-Kohli-Celebration
---Advertisement---

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याच्या शतकांचा दुष्काळ खरं तर मागील वर्षीच संपला होता. मात्र, कसोटीत तो धावा करताना संघर्ष करत होता. त्याला 3 वर्षांपासून कसोटीत शतक ठोकता आले नव्हते. अशात चाहत्यांपासून संघालाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट मोठी खेळी करेल, अशी आशा होती. विराटनेही चाहत्यांना निराश केले नाही. त्याने पहिल्या तीन कसोटीत खास कामगिरी केली नाही, पण अहमदाबाद कसोटी सामन्यात त्याने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. त्याने यादरम्यान 28वे कसोटी शतक साकारले. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75वे शतकही पूर्ण केले. अशात शतकानंतर विराट कोहलीचे सेलिब्रेशन सर्वांना भावले आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फलंदाजांसाठी फायदेशीर असलेल्या अहमदाबाद येथील खेळपट्टीवर विराट कोहली (Virat Kohli) खूपच संयमाने खेळला. त्याने आपले शतक पूर्ण करण्यासाठी फक्त 5 चौकार मारले. त्याने यावेळी 241 चेंडूंचा सामना करत 100 धावा करत शतक साजरे केले. विराटने यावेळी शतक करताच खास अंदाजात सेलिब्रेशन केले. त्याने यावेळी कोणताही आक्रमकपणा दाखवला नाही. तो मैदानावर फक्त शांत अंदाजात हसताना दिसला आमि त्याने आपल्या गळ्यातील नेकलेस बाहेर काढून त्याचे चुंबन घेतले. यावेळी विराटचे स्मितहास्य पाहून असे वाटत होते की, त्याच्या खांद्यावरचे ओझे कमी झाले आहे.

विराटचा हा व्हिडिओ आयसीसीने आणि बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

https://www.instagram.com/reel/CprikMyDWHa/?utm_source=ig_embed&ig_rid=abc68981-507b-4962-964e-0167ca6888d3

विराटला कसोटीत शतक करण्यासाठी 1205 दिवस प्रतीक्षा
विराट कोहली याच्या शतकांचा दुष्काळ मागील वर्षी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 शतकानेच संपला होता. त्याने वनडेतील शतकाचा दुष्काळही बांगलादेश दौऱ्यावर संपवला होता. मात्र, कसोटी शतकाची प्रतीक्षा त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संपवली. त्याच्यापूर्वी विराट कोहली याने त्याचे शेवटचे कसोटी शतक नोव्हेंबर, 2019मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात ठोकले होते. त्यानंतर चाहत्यांना विराटचे कसोटी शतक पाहण्यासाठी तब्बल 1205 दिवस प्रतीक्षा करावी लागली. (ind vs aus 4th test virat kohlis celebration after completing his 28 test century see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर विराटच्या कसोटी शतकांचा दुष्काळ संपला, सेंच्युरीसाठी घेतले वनडे अन् टी20पेक्षाही जास्त दिवस, वाचाच
किंग कोहलीची गर्जना! विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले शतक, 3 वर्षांचा दुष्काळ अखेर संपवलाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---