---Advertisement---

टीम इंडियाला टी२०चा इतिहास नव्याने लिहिण्याची आज संधी

---Advertisement---

ब्रिस्बेन | भारताच्या बहुचर्चित आॅस्ट्रेलिया दौऱ्याला आज सुरुवात होत आहे. द गाबा, ब्रिस्बने येथे होत असलेल्या टी२० सामन्याने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील आजचा हा सामना भारतासाठी खूप अर्थांनी महत्त्वाचा आहे.

याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीची टीम इंडिया आॅस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्याच आठवड्यात संघ येथे पोहचला अाहे.

भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध १५ टी२० सामने खेळला असून यातील १० सामने जिंकला आहे तर केवळ ५ सामन्यात संघाला पराभव पहावा लागला आहे.

भारतीय संघ आॅस्ट्रेलियात ६ सामने खेळला असून यातील ४ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

विशेष म्हणजे हे चारही विजय लागोपाठच्या सामन्यातील आहे. २०१५-१६ मध्ये भारतीय संघ ३ टी२० सामन्यांची मालिका ३-० असा जिंकला होता तर २०११-१२मध्ये संघाने शेवटचा टी२० सामना जिंकला होता.

त्यामुळे जर या टी२० मालिकेतील पहिला सामना संघाने जिंकला तर आॅस्ट्रेलियाच्या भूमीवर सलग ५ टी२० सामने जिंकणारा भारतीय संघ पहिला संघ होईल.

महत्त्वाच्या बातम्या:

महिला टी२० विश्वचषकच्या अशा होणार सेमीफायनल

कसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी

मुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय

नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच

अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment