INDvsAUS 5th T20: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पाच सामन्यांची टी20 मालिका अनेक अर्थाने खास ठरली. अखेरच्या सामन्यात भारताने 6 धावांनी विजय मिळवत मालिकाही 4-1ने खिशात घातली. याव्यतिरिक्त भारतीय संघाचा फिरकीपटू रवी बिश्नोई याच्यासाठीही संपूर्ण मालिका यादगार राहिली. बिश्नोईच्या फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अडकत गेले. यामुळे बिश्नोईच्या नावावर खास विक्रमही नोंदवला गेला. अशात 23 वर्षीय रवी बिश्नोईने आर अश्विनच्या विक्रमाची बरोबरी केली.
बिश्नोईने केली अश्विनच्या विक्रमाची बरोबरी
रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) हा एका टी20 मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत संयुक्तरीत्या अव्वलस्थानी पोहोचला आहे. या विक्रमात रवी बिश्नोईने आर अश्विन (R Ashwin) याच्या विक्रमाची बरोबरी (Ravi Bishnoi equaled R Ashwin’s record) केली. अश्विनने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेत 9 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, बिश्नोईनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
पाचव्या टी20त केली शानदार गोलंदाजी
रवी बिश्नोईने पाचव्या टी20 सामन्यात आपल्या फिरकीच्या जाळ्यात कांगारू फलंदाजांना अडकवले. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना फक्त 29 धावा खर्चून 2 मोठ्या विकेट्स नावावर केल्या. त्याने भारतासाठी मोठा धोका ठरत असलेल्या ट्रेविस हेड याला त्रिफळाचीत बाद करत तंबूत पाठवले. त्यानंतर त्याने दुसरी शिकार ऍरॉन हार्डी याच्या रूपात केली. त्याला फक्त 6 धावांवर तंबूचा रस्ता पकडावा लागला.
भारताने 4-1ने मालिका केली नावावर
भारतीय संघाने ही मालिका 4-1ने नावावर केली. अखेरच्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यर याच्या 53 धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने 160 धावांपर्यंत मजल मारली. भारताच्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ 20 षटकात 8 विकेट्स गमावत 154 धावाच करू शकला. यावेळी गोलंदाजी करताना भारताकडून मुकेश कुमार चमकला. त्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट नावावर केल्या. याव्यतिरिक्त अक्षर पटेल यालाही एक विकेट मिळाली. (ind vs aus 5th t20 bowler ravi bishnoi equals r ashwin record of most wickets in an t20i series)
हेही वाचा-
ब्रेकिंग! INDvsSA तिन्ही मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने घोषित केला संघ, ‘या’ पठ्ठ्याकडं टीमची धुरा
‘मला गोलंदाजी करायची आहे, पण…’, श्रेयस अय्यरचा गोलंदाजी करण्याबाबत धक्कादायक खुलासा