भारताविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यंदाच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे 5 सामन्यांचे तीन सामने खेळले गेले आहेत. तर सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. गेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या संघात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. नॅथन मॅकस्विनीला संघातून वगळण्यात आले. तर वेगवान गोलंदाज झ्ये रिचर्डसनने तीन वर्षांनंतर प्रथमच कसोटी संघात पुनरागमन करत आहे. 19 वर्षीय सॅम कोन्स्टासलाही संघात स्थान मिळाले आहे.
सॅम कोन्स्टासला भारताविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाल्यास तो गेल्या 70 वर्षांत ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरेल. यापूर्वी 1952 मध्ये इयान क्रेगने वयाच्या 17 वर्षे 239 दिवसांमध्ये पदार्पण केले होते. तो ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू देखील आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतील अंडर19 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर कॉन्स्टासने वरिष्ठ क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात केली आहे.
न्यू साउथ वेल्सच्या पहिल्या शेफिल्ड शील्ड सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 152 आणि 105 धावा केल्या, त्यानंतर एमसीजी (MCG) येथे भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघासाठी नाबाद 73 धावा केल्या. ज्यात सध्याचा कसोटी अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी देखील समाविष्ट होता. यासोबतच संघात वेगवान गोलंदाज झ्ये रिचर्डसनचाही समावेश करण्यात आला आहे. जो 2011-22च्या ऍशेसनंतर संघात परतला आहे.
मेलबर्न आणि सिडनी कसोटीसाठी वेगवान गोलंदाज शॉन ॲबॉटचाही संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्याशिवाय, अनकॅप्ड अष्टपैलू ब्यू वेबस्टरला देखील संघात पुन्हा सामील करण्यात आले. ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटीपूर्वी ब्यू वेबस्टरचा समावेश करण्यात आला होता.
ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टन्स, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, मिशेल स्टार्क, ब्यू वेबस्टर
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला धक्का, या मुख्य स्पर्धेत खेळणार नाही हार्दिक पांड्या, मोठे कारण समोर
‘रविचंद्रन अश्विनला चांगली वागणूक मिळाली नाही…’, माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान
मेलबर्न कसोटी सामन्यासाठी संघात मोठा बदल, हा खेळाडू होणार ड्राॅप