ॲडलेडमधील पराभवानंतर आता टीम इंडिया गाबामध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात अनेक बदल करू शकते. भारतानं पर्थमध्ये कांगारूंचा 295 धावांनी पराभव करून बॉर्डर-गावस्कर मालिकेची सुरुवात विजयानं केली होती. परंतु ऑस्ट्रेलियानं पलटवार करत ॲडलेडमध्ये भारताचा 10 गडी राखून पराभव केला. आता उभय संघांमधला तिसरा कसोटी सामना शनिवार, 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळला जाणार आहे.
ॲडलेडमधील पराभवानंतर रविचंद्रन अश्विन आणि हर्षित राणा यांना गाबा कसोटीसाठी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. याशिवाय केएल राहुलच्या फलंदाजी क्रमाबाबतही साशंकता आहे. राहुलच्या जागी कर्णधार रोहित शर्मा डावाची सुरुवात करू शकतो, तर केएल राहुल मधल्या फळीत खेळू शकतो.
कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे गाबा येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत डावाची सुरुवात करू शकतात. यानंतर शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. गिलनंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. 2021 मधील गाबा कसोटीतील विजयाचा हिरो रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे.
पंतनंतर केएल राहुल सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो. यापूर्वी राहुलनं दोन कसोटी सामन्यांमध्ये डावाची सुरुवात केली होती. मात्र, पहिल्या कसोटीत रोहित शर्मा संघासोबत नव्हता. दुसऱ्या कसोटीत रोहित सहाव्या क्रमांकावर खेळला. अश्विनच्या जागी या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर किंवा रवींद्र जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर नितीशकुमार रेड्डी खेळताना जिसेल.
तीन वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचं झाल्यास, हर्षित राणाच्या जागी आकाशदीप खेळू शकतो. तर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांची जोडी कायम असेल.
तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर/रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) , मोहम्मद सिराज आणि आकाशदीप
हेही वाचा –
टी20 विश्वचषक विजयापासून रोहित-विराटची निवृत्ती, भारतासाठी कसं राहिलं 2024 हे वर्ष?
“रोहित शर्माचं वजन जास्त आहे, तो मोठ्या कसोटी मालिकांसाठी फिट नाही”, माजी क्रिकेटपटूची सडकून टीका
ॲडलेडमधील फ्लॉप शोनंतर रोहित शर्मा पुन्हा बदलणार बॅटिंग ऑर्डर, केएल राहुलचं काय होणार?