भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले आहेत. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळला जाणार असून या सामन्यापूर्वी पुढील 24 तास टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
वास्तविक, ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज गाबामध्ये खेळू शकेल की नाही हे येत्या 24 तासांत कळेल. हा खेळाडू दुसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड आहे. हेजलवूड पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. मात्र दुखापतीमुळे तो दुसरा सामना खेळू शकला नाही. आता तो तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी फिट आहे की नाही हे येत्या 24 तासांत कळेल.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मी खेळू शकेल की नाही हे येत्या 24 तासांतच ठरवेल, असं खुद्द हेजलवूडनं म्हटलं आहे. हेजलवूडने आज नेटमध्ये गोलंदाजीचा सराव केला. त्याला साइड स्ट्रेनची समस्या आहे. सरावादरम्यान त्यानं त्याच्या फिटनेसची चाचणी घेतली. मीडियाशी बोलताना हेजलवूड म्हणाला, “मला वाटतं की मी पुढचे 24 तास कसे हाताळतो यावर बरंच काही अवलंबून असेल. अर्थातच दोन स्पेलमुळे मोठा फरक पडू शकतो. काही गोष्टी बरोबर झाल्या आहेत, पण येत्या 24 तासांत मी खेळायला तयार आहे की नाही हे कळेल.”
हेजलवूड तंदुरुस्त झाल्यानंतर संघात आला तर ते भारतासाठी अडचणीचं ठरू शकतं. त्याला सध्याच्या काळातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक मानलं जातं. तो ऑस्ट्रेलियात आणखी कहर करू शकतो. हेजलवूड तिसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त नसल्यास ते भारतासाठी दिलासादायक ठरेल.
जोश हेजलवूड अशा दुखापतीशी झुंजण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यानं याचा सामना केला आहे. आता तो गाबा कसोटीत खेळू शकतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
“तुम्ही आराम करु शकत नाही… “, लाजिरवाण्या पराभवानंतर सुनील गावस्करांनी टीम इंडियाला सुनावलं
टीम इंडिया अजूनही WTC फायनलमध्ये पोहचू शकते का? आता हा एकच मार्ग बाकी
गोलंदाजीनंतर मोहम्मद शमीचा फलंदाजीतही कहर! या स्पर्धेत चौकार-षटकारांची आतषबाजी





