भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांची शानदार कामगिरी केली. सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालनं टीम इंडियाला उत्कृष्ट सुरुवात करून दिली. यशस्वीनं ऑस्ट्रेलियातील त्याचं पहिलं शतक ठोकलं. तो 161 धावा करून बाद झाला. तर केएल राहुलनं 77 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारी केली.
केएल राहुलच्या या शानदार कामगिरीनंतर चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील कसोटीत भारतीय संघाची प्लेइंग 11 काय असेल? खरंतर, कर्णधार रोहित शर्मा 24 नोव्हेंबरला भारतीय संघात सामील होणार आहे. रोहितच्या पुनरागमनानंतर तो सलामीला खेळेल हे पक्क आहे. त्यामुळे ॲडलेड कसोटीत (6-10 डिसेंबर) राहुल कोणत्या क्रमांकावर खेळतो किंवा रोहितसाठी त्याला संघातून ड्रॉप केलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सध्या सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. चाहते यावर आपलं मत मांडत आहेत. एका चाहत्यानं गंमतीत म्हटलं की, राहुलच्या या चमकदार कामगिरीनंतर रोहित शर्माला दुसऱ्या कसोटीतून बाहेर बसावं लागू शकतं. तर रोहितनं कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असा सल्ला एका चाहत्यानं दिला आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी शुबमन गिल देखील उपलब्ध असणार आहे. तो पहिल्या कसोटीपूर्वी सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. तो संघात परतल्यास तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. अशा परिस्थितीत देवदत्त पडिक्कलला आपलं स्थान गमवावं लागू शकतं. पडिक्कलसाठी ही कसोटी फारशी चांगली गेली नाही. तो पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात त्यानं 25 धावा केल्या. त्यामुळे पुढील कसोटीत त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह आहेत.
हेही वाचा –
नॅथन लायनच्या जाळ्यात अडकला पंत, मोठा शॉट खेळण्याच्या नादात चारीमुंड्या चित!
शतक एक रेकॉर्ड्स अनेक! 22 वर्षांच्या यशस्वीनं केली सचिन-गावस्करची बरोबरी
IND VS AUS; पर्थमध्ये तिसऱ्या दिवशीही खेळपट्टीचा रंग बदलला! टीम इंडियासाठी किती धावसंख्या सुरक्षित?