---Advertisement---

ब्रिस्बेन कसोटी गाजवणारा शार्दुल ठाकूरने केला गेमप्लॅनचा खुलासा; म्हणाला, ‘आमची योजना होती की…”

On: रविवार, जानेवारी 17, 2021 10:50 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. त्याचबरोबर दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे आणि अनिर्णीत राहिला आहे. त्यामुळे दोन्ही संघ बरोबरीत आहेत. त्यामुळे ब्रिस्बेन येथे खेळला जात असलेला चौथा सामना रोमांचक होत आहे. या सामन्यातील तिसर्‍या दिवशी शार्दूल ठाकूरने दमदार अर्धशतकी खेळी करून भारतीय संघाला तारले. त्यांनंतर शार्दूल ठाकूरने आपल्या खेळीबद्दल प्रतिक्रीया दिली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या सामन्यात, भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात 186 धावसंख्येवर 6 गडी गमावले होते. त्यामुळे भारतीय संघाची स्थिती बिकट झाली होती. मात्र शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दमदार कामगिरी करताना सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली . भारतीय संघाला त्यामुळे पहिल्या डावात सर्वबाद 336 धावा करता आल्या. यामध्ये वॉशिंग्टन सुंदरने 144 चेंडूचा सामना करताना 7 चौकार आणि 1 षटकार ठोकत 62 धावांची खेळी केली. त्याचबरोबर शार्दूल ठाकूरने 115 चेंडूचा सामना करताना 2 षटकार आणि 9 चौकार लगावत 67 धावांची खेळी केली.

तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आपल्या या खेळीबद्दल बोलताना शार्दूल ठाकूर म्हणाला, “ते माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते. परंतु मी त्यांना उत्तर दिले नाही. एकदा किंवा दोनदा मी त्यांना एका शब्दात उत्तर दिले. त्याचबरोबर त्यांनी माझ्या सोबत स्लेजींग करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपले खेळणे सुरू ठेवले.”

शार्दूल ठाकूर पुढे म्हणाला,” आम्ही धाव फलकाकडे बघत नव्हतो. आमची योजना धावपट्टीवर काही वेळ घालवण्याची होती. आम्हाला माहित होते की, त्यांचे गोलंदाज थकत आहेत आणि ही पहिल्या तासाची गोष्ट आहे. यासाठी आमची योजना होती की, जर आम्ही त्यांच्या गोलंदाजांना अजून दमवले तर आम्ही सामन्यात टिकून राहू. यामुळे आमच्यासाठी हे गरजेचे होते की, आम्ही त्यांना दमवू आणि कमकुवत चेंडूचा फायदा उचलू.”

ठाकूर म्हणाला,” जेव्हा आम्ही धावपट्टीवर नवीन होतो, तेव्हा बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न करत होतो. जस – जशी आमची भागीदारी मोठी होत गेली, तेव्हा आम्ही शॉट खेळण्याला सुरुवात केली. आम्हाला माहित होते की, गाबा येथे चेंडू उसळी घेतो आणि जर गोलंदाज आपल्या लाइन-लेंथ पासून भटकला तर आम्ही खराब चेंडूवर शॉट खेळू शकतो. ”

ऑस्ट्रेलिया संघाने तिसर्‍या दिवस अखेर आपल्या दुसर्‍या डावाला सुरुवात करताना 6 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 21 धावा केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावातील 33 धावांची आघाडी आणि या 21 धावांच्या आधारावर 54 धावांची आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“माझे वडील, माझे हिरो”, हार्दिक पंड्याने वडिलांच्या निधनानंतर शेअर केली भावनिक पोस्ट

टीम इंडिया २००३ साली ऑस्ट्रेलियात केलेल्या ‘या’ चमत्काराची करणार का पुनरावृत्ती?

Video: वॉशिंग्टन सुंदरने ठोकलेला उत्तुंग षटकार पाहून ‘या’ खेळाडूला झाली युवराजची आठवण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---