भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये तिसरा आणि अखेरचा वनडे सामना कॅनबेरा येथे बुधवारी(2 डिसेंबर) पार पडला. सुरुवातीच्या दोन सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने या मालिकेत क्लीनस्वीप टाळला. मात्र ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली. या मालिकेचा शेवट विजयाने केल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल मत व्यक्त केले आहे.
शुबमन आणि इतर खेळाडूंच्या आगमनाने आला ताजेपणा
पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना विराट म्हणाला की, “ऑस्ट्रेलियच्या डावाच्या पहिल्या आणि दुसऱ्या उत्तरार्धात आमच्या संघावर दबाव होता. शुबमन आणि इतर खेळाडूंच्या आगमनाने संघात थोडा ताजेपणा आला. संघाला अशाच प्रकारच्या मनोबलाची आवश्यकता आहे.”
गोलंदाजांनी केली चांगली कामगिरी
पहिल्या दोन सामन्यात साधारण गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी कॅनबेरा येथील मनुका ओव्हल या मैदानावर चांगली कामगिरी केली. पहिले दोन सामने खेळल्या गेलेल्या सिडनीतील खेळपट्टीपेक्षा ही खेळपट्टी चांगली असल्याचे मत कोहलीने व्यक्त केले.
खेळपट्टीबद्दल बोलताना तो म्हणाला की, “माझ्या मते गोलंदाजांसाठी खेळपट्टी चांगली होती. त्यामुळे आत्मविश्वासाची पातळीही वाढली. बर्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना तुम्हाला अशा आव्हानांचा सामना करावा लागतो. गोलंदाजांनी या मैदानावर चांगली कामगिरी केली.”
ही लय पुढेही राखू कायम
कोहलीने या सामन्यात 63 धावा फटकावल्या. त्यानंतर रवींद्र जडेजा (66 धावा) आणि हार्दिक पांड्या (92 धावा) या दोन अष्टपैलू खेळाडूंनी 6 व्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी करत भारताला 303 धावसंख्या गाठण्यास मदत केली.
संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना विराट म्हणाला की, “मी संघाच्या कामगिरीवर खूष आहे आणि आशा आहे की आम्ही ही लय पुढेही कायम राखू. मला आणखी थोडा काळ टिकून खेळायला पाहिजे होतं. पांड्या आणि जडेजाने चांगली भागीदारी केली.”
ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहावे लागते सतर्क – हार्दिक पंड्या
हार्दिकने केलेल्या 92 धावांच्या खेळीमुळे त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना तुम्हाला सतर्क राहावे लागते आणि जेव्हा तुम्ही या संघाविरुद्ध खेळता तेव्हा तुम्हाला अधिक चांगली कामगिरी करावी लागते. तुम्हाला अशा प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो.”
….तर जास्तीत जास्त 240 धावांच्या लक्ष्याचा करावा लागला असता पाठलाग
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच म्हणाला की, “मला वाटते की आम्ही भारतीय संघाचा चांगला सामना केला. हार्दिक आणि जडेजा यांच्यात चांगली भागीदारी झाली. जर आम्ही यातील एक बळी घेतला असता, तर जास्तीत जास्त 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागला असता. पदार्पण करणाऱ्या कॅमरॉन ग्रीनने फलंदाजीच नव्हे, तर गोलंदाजीनेही प्रभावित केले.”
महत्त्वाच्या बातम्या –
याला म्हणतात दर्जा! जेव्हा मॅकॅग्राने ५३ डॉट टाकत सचिन-गांगुलीला खेळायला लावली होती कसोटी
आयसीसी टी20 क्रमवारीत मोठा बदल! ऑस्ट्रेलियाला मागे टाकत ‘या’ संघाने गाठले अव्वल स्थान
विकेट घेतल्यानंतर शार्दुल ठाकूरचे जोरदार सेलिब्रेशन, हेन्रीक्सला दिली खुन्नस, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव