क्रिकेटटॉप बातम्याभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

VIDEO: याला म्हणतात दर्जा! जेव्हा मॅकॅग्राने 53 डॉट टाकत सचिन-गांगुलीला खेळायला लावली होती कसोटी

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा हा 90 च्या दशकातील घातक वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. त्याने अनेकदा त्याच्या गोलंदाजीपुढे फलंदाजांना अक्षरश: लोटांगण घालायला लावले. त्याच्या कारकिर्दीत त्याने 750 पेक्षाही अधिक विकेटस् घेतल्या. यातील 85 विकेट्स त्याने भारताविरुद्ध घेतल्या. त्यातील 2000 मध्ये सिडनी येथे भारताविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात त्याने केलेली भेदक गोलंदाजी अनेकांच्या लक्षात असेल.

14 जानेवारी 2000 ला हा सामना झाला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली होती. यावेळी भारताला सुरुवातीलाच मॅकग्राने मोठे धक्के दिले होते. पहिल्या 11 षटकांच्या आतच मॅकग्राने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दिग्गजांना बाद करत माघारी धाडले होते. 11 षटकात भारताला 20 धावा देखील करता आल्या नव्हत्या.

त्या सामन्यात मॅकग्राने गोलंदाजी करताना चेंडूची दिशा आणि टप्पा इतका अचुक ठेवला होता की भारतीय फलंदाजांना त्याच्या विरुद्ध धावाच करता येत नव्हत्या. त्याने सचिन, गांगुली आणि लक्ष्मणला बाद केल्यानंतर 33 व्या षटकात समिर दिघेलाही बाद केले.

त्या संपूर्ण सामन्यात मॅकग्राने 10 षटके गोलंदाजी टाकताना केवळ 8 धावा दिल्या होत्या आणि 4 विकेट्स घेतल्या होत्या. एवढेच नाही तर तब्बल 53 चेंडू मॅकग्राने निर्धाव टाकले होते. यावरुन समजते की मॅकग्राने त्या सामन्यात किती टीचून आणि सातत्यपूर्ण गोलंदाजी केली होती.

त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ cricket.com.au च्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमधून मॅकग्राच्या गोलंदाजीची भेदकता दिसून येते.

त्यासामन्यात मॅकग्रा व्यतिरिक्त अँड्र्यू सायमंड्सनेही कमालीची गोलंदाजी करत 3.3 षटकात 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे भारताला 36.3 षटकात सर्वबाद 100 धावाच करता आल्या होत्या. भारताकडून राहुल द्रविडने सर्वाधिक 22 धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने 27 व्या षटकात 5 बाद 101 धावा करत हा सामना जिंकला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA WC 2022: कॅमरूनने ब्राझीलचा विजयरथ थांबवत रचला इतिहास, स्वित्झर्लंड सुपर-16मध्ये
…तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता! ब्रॅडमन अन् ध्यानचंद यांच्या भेटीचा रोमांचक किस्सा

Related Articles